करिअर निवडण्यासाठी सदृढ आरोग्य महत्त्वाचे..! आयुर्वेदाचार्य डॉ.हिमगौरी वडगावकर
बारामती :- ' योग्य करिअर निवडीसाठी किशोरवयीन मुला-मुलींनी शारीरिक मानसिक तंदुरुस्त असणे खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ.हिमगौरी वडगावकर यांनी केले आहे.
बारामती येथील रागिनी फाउंडेशनच्या माध्यमातून किशोरवयीन युवतींसाठी 'स्मार्ट गर्ल'अभियान सुरू केले आहे या माध्यमातून किशोरवयीन मुलींना आरोग्य,मानसिक स्वास्थ्य, अभ्यासाच्या पद्धती, संप्रेरकांमुळे होणारे बदल, परिणाम आणि उपाय योजना, स्वसंरक्षण, व कायदेविषयक मार्गदर्शन केले जाते.
डॉ वडगावकर यांनी किशोरवयीन मुलींना वाढत्या वयात संप्रेरकांमुळे होणारे बदल, त्याचे परिणाम व उपायोजना यांबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उत्तम करिअर निवडण्यासाठी आपण अभ्यासाबरोबर असताना त्यांना व्यवस्थापन, परिपूर्ण जीवन शैली, व्यायाम यांचा अंगीकार केल्यास बौद्धिक क्षमता वाढण्यास निश्चितच मदत होते यांबद्दल देखील त्यांनी सांगितले. यावेळी मुलींनी देखील मुक्तपणे संवाद साधत आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवली.
किशोरवयीन मुलींना शैक्षणिक जडणघडणी बरोबरच मानसिक आधार मिळावा व किशोर वयात येणाऱ्या समस्या, मनात निर्माण होणाऱ्या शंकाचे निरसन व्हावे या उद्देशाने अभियानाची सुरुवात केली असल्याचे रागिणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले. यासाठी किशोरवयीन मुलींचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत आहे. असेही त्यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी घनश्याम केळकर व आचार्य अकॅडमीच्या साधना दळवी सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम आचार्य अकॅडमी येथे संपन्न झाला.
No comments:
Post a Comment