बारामतीत शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन
बारामती दि.१९: येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी भिमनगर महिला समितीच्या वतीने उपस्थितांना लाडू वाटून तोंड गोड करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम अहिवळे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी नगरसेवक रमेश मोरे यांनी केले.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे,मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष विकास खोत,माजी विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते,माजी बसपचे काळुराम चौधरी,नगरसेवक गणेश सोनवणे,समीर चव्हाण,आप्पा अहिवळे,राजेंद्र सोनवणे,भारत मुक्ती मोर्चाचे ॲड.सुशिल अहिवळे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष संदीप गुजर,युवकाध्यक्ष सत्यव्रत काळे,मनोज केंगार,संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अस्लम तांबोळी,प्रा.सुषमा जाधव,प्रा.विद्याराणी चव्हाण,प्रा.शिलाराणी रंधवे,वि श्री कांबळे,सुरज शिंदे,भूषण ढवाण,सागर लोंढे,सत्यजित काटकर,प्रीतम गुळूमकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जयंती महोत्सव समितीचे सदस्य गौतम शिंदे,गजानन गायकवाड,सोमनाथ रणदिवे,चेतन साबळे,परीक्षित चव्हाण,विश्वास लोंढे,कैलास शिंदे यांनी केले होते.
No comments:
Post a Comment