बारामती नगर परिषदेसमोर बहुजन समाज पार्टी चे बेमुदत धरणे आंदोलन..
बारामती:-बारामती नगर परिषदे समोर बहुजन समाज पार्टी बारामतीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन चालू असून यासंबंधी मुख्याधिकारी
बारामती नगर परिषद, बारामती, ता. बारामती, जि. पुणे.यांना दि. 21/02/2024 पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे लेखी पत्र देण्यात आले असून,आपल्या बा. न. प. च्या आरोग्य विभागामध्ये NDK HOSPITALITY या नावाचा कंत्राटी ठेका जुलै 2022 पासुन चालु आहे. या ठेक्याच्या करारनाम्यामध्ये कंत्राटदाराने 500 रू. च्या स्टॅम्पवर सर्व प्रचलित कामगार कायद्यांचे पालन केले जाईल असे लेखी स्वरूपात दिलेले असुन देखील कामगारांना किमान वेतनाने पगार, पी. एफ, ई. एस. आय. सी. मिळत नाही. अशी वारंवार तक्रार कामगारांमार्फत केली जात आहे. तरीदेखील आपणाकडुन या
कंत्राटदारावर कसल्याही प्रकारची कारवाई अद्याप केलेली नाही. मी माहिती अधिकार व
प्रथम अपिलीय निर्णयामध्ये संपुर्ण माहिती दयावी असे असुन देखील मला कसल्याही
प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.तरी साहेब आपण या प्रकरणाची गांभिर्यपुर्वक दखल घ्यावी अन्यथा आम्ही दि. 21/02/2024 पासुन बा य. न. प. च्या नगरपरिषदेसमोर सर्व कामगारांना घेऊनवेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत तरी आमच्या मागण्या खालीलप्रमाणे.
जुलै 2022 ते आजपर्यंत काम करीत असलेल्या सर्व कामगारांना किमान वेतनाने5
पगार, पी. एफ. ई. एस. आय. सी. देण्यात यावे.
2. सदरील पैसे व09 उचलदेखील त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे.
3 काम सोडुन गेलेल्या कामगारांनादेखील त्यांच्या कामाच्या कालावधीपमाणे पगार,
पी. एफ. ई. एस. आय. सी. देण्यात यावे. (पी. एफ. पगाराच्या 25 टक्के)
५. काम करीत असलेल्या सर्व कामगारांचा नुकसान भरपाई विमा काढन्यात यावा.
5. माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणा-या मा जनमाहिती अधिकारी तथा
आरोग्यप्रमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
6. NDK HOSPITALITY हे कंत्राट कायमस्वरूपी बंद करून ठेकेदाराला काळया
यादीत टाकण्यात यावे अशी मागणी
चंद्रकांत खरात व
दादा शिवाजी टेकाळे केली असल्याचे सांगण्यात आले,माहितीसाठी प्रत :
1. मा. निरिक्षक, बारामती शहर पोलिस स्टेशन, बारामती.
2. मा तहसिलदार , तहसिल कार्यालय, बारामती.
3. मा. उपविभागिय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, बारामती.यांना लेखी पत्र दिल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment