मिरवणूकमध्ये डी .जे .चा वापर करू नये: महिलांची मागणी. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 27, 2024

मिरवणूकमध्ये डी .जे .चा वापर करू नये: महिलांची मागणी.

मिरवणूकमध्ये डी .जे .चा वापर करू नये: महिलांची मागणी.
बारामती:- महापुरुषांच्या जयंती वेळी शहरातून काढत असलेल्या मिरवणुकीत डी. जे. चा वापर करू नये त्या ऐवजी पारंपारिक वाद्य यांचा वापर करावा  अशी मागणी बारामती शहर व तालुक्यातील सर्व महिलांनी केली आहे.
  मंगळवार दि.२७ फेब्रुवारी रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन ला सदर निवेदन देण्यात आले या प्रसंगी  सर्व समाज्यातील  शहर व तालुक्यातील सर्व  महिला उपस्थित होत्या.
महापुरुषांचे विचार डोक्यावर घेऊन नाचायचे नाही तर डोक्यात घेऊन त्याचे आचरण करणे गरजेचे आहे.
 डी. जे. लावून  व मद्यपान करून   अश्लील व  विभत्स डान्स करू नये  व पाश्चिमात्य संस्कृती चे अनुकरण होऊ नये व ध्वनी प्रदूषण सुद्धा होऊ नये त्याच प्रमाणे मिरवणूक परिसरात ध्वनी प्रदूषण होऊन लहान बालके व  गर्भवती महिला यांना त्रास होणार नाही   याची काळजी प्रत्येक तरुण मंडळ, संस्था, संघटना ,समाज बांधव यांनी घ्यावी तर डी. जे.  ऐवजी बँड पथक किंवा इतर वाद्ये वाजवावीत जेणेकरून शिस्तबद्ध  व आदर्शवत मिरवणूक, ध्वनी प्रदूषण मुक्त मिरवणूक  व्याहवी  व जिवंत देखावे आणि समाज उपयोगी व्याख्याने घ्यावेत  या साठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व त्याचे आचरण करावे असेही  निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 महापुरुषाच्या जयंती निमित्त डि. जे. वाजवू नये सर्व समाजातील महिलांनी एकत्र येऊन पोलिस स्टेशन येथे निवेदन दिले.

No comments:

Post a Comment