संतापजनक..अकॅडमी व निवासी शाळेतील नववीत शिकणारी मुलीवर वारंवार अत्याचार;५८ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल...*क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून तक्रारी करण्याचे होत आहे आवाहन..* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 5, 2024

संतापजनक..अकॅडमी व निवासी शाळेतील नववीत शिकणारी मुलीवर वारंवार अत्याचार;५८ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल...*क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून तक्रारी करण्याचे होत आहे आवाहन..*

संतापजनक..अकॅडमी व निवासी शाळेतील नववीत शिकणारी मुलीवर वारंवार अत्याचार;५८ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल...*क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून तक्रारी करण्याचे होत आहे आवाहन..*
पुणे:- पालक आपली मुलं शिकावी व चांगली घडावी या उदिष्ठाने अकॅडमी,क्लासेस मध्ये ज्यादा फी भरून विश्वासाने शिकायला पाठवीत असतात नुकताच धक्कादायक बातमी समोर आली एकदा नव्हे दोनदा नव्हे तर चक्क तीनदा गुन्हा दाखल झाला असल्याचे समजतंय याबाबत मिळालेली माहिती अशी की,दहावीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आलेल्या नौशाद अहमद शेख (५८) याच्याविरोधात शनिवारी (दि. ३) आणखी एक गुन्हा दाखल करण्यात
आला. त्याच्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पीडित विद्यार्थिनीने याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने पीडित मुलीसोबत गैरवर्तन करून तिच्या मनास लज्जा
उत्पन्न होईल, असे कृत्य केले. अल्पवयीन मुलीचा
विनयभंग केला. याबाबत मुलीने भितीपोटी कोणालाही काही सांगितले नाही. दरम्यान, शेख याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका अल्पवयीन विद्यार्थिनीने केली.त्यानुसार ३० जानेवारी रोजी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल करून पोलिसांनी शेख याला अटक केली. त्याला सोमवारपर्यंत (दि. ५) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी चर्चा
केली. तसेच त्यांचे समुपदेशन करून गैरप्रकार झाला असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यामुळे पीडित विद्यार्थिनीने गैरप्रकार झाल्याचे सांगितले. त्यावरून
गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित नौशाद शेख याने आणखी काही विद्यार्थिनींसोबत
गैरकृत्य केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे. त्यात शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी रविवारी देखील चर्चा करण्यात आली.
राज्यातील इतर शहरांतील विद्यार्थिनींच्या आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. तक्रार असल्यास त्यांच्या घरी जाऊन माहिती घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.'त्या' विद्यार्थ्यांच्या पालकांचा मुक्काम शाळेतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांसोबत थांबण्याची परवानगी दिली आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांना
त्यांच्या घरी जाण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे
विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी शाळेत पालकांची गर्दी होत आहे.नौशाद शेख याच्या विरोधात २०१४ मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता,
 शाळेतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांसोबत थांबण्याची परवानगी दिली आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी शाळेत पालकांची गर्दी होत
आहे.अत्याचारप्रकरणी तिसरा गुन्हा नौशाद शेख याच्या विरोधात २०१४ मध्ये पहिला गुन्हा
दाखल झाला होता. त्यानंतर ३० जानेवारी आणि
त्यापाठोपाठ शनिवारी तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून याबाबत अधिक चौकशी चालू आहे.

No comments:

Post a Comment