धक्कादायक..ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन
मुलीसोबत गैरवर्तन;घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी.
पुणे :- महिला व मुली सुरक्षित नसल्याचे अनेक उदाहरणे पुढे येत आहे,महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कॉलेज,ट्युशनला,क्लासेसला जाणाऱ्या मुलींना भररस्त्यात अडवून त्यांच्यासोबत गैरवर्तन
करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
अशीच एक घटना खडक पोलीस
स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून
घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून 2023 ते 19 फेब्रुवारी दरम्यान वेळोवेळी किराड हौद परसिरातील एका क्लास च्या समोर घडला आहे.
याबाबत नाना पेठेत राहणाऱ्या 16 वर्षीय
अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि.20) खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून यशराज दिनेश पाटोळे (रा. गंजपेठ, सावधान मंडळा शेजारी, पुणे)याच्यावर आयपीसी 354(अ), 354 (ड),504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलगी किराड हौद परिसरात एका क्लासला जाताना व
येताना आरोपी रस्त्यात थांबून तिच्याकडे
पाहत होता. याबाबत मुलीने त्याच्याकडे
विचारणा केली असता त्याने तु मला
आवडतेस असे म्हणत मोबाईल नंबर
मागितला. घाबरलेल्या मुलीने याबाबत
कोणाला काहीही सांगितले नाही. दरम्यान
आरोपीने त्याचा मोबाईल नंबर लिहिलेली
चिठ्ठी मुलीला देऊन फोन करण्यास
सांगितले. फोन केला नाही तर तुझ्या घरी येवुन
तमाशा करेल अशी धमकी दिली.घाबरलेल्या मुलीने आरोपीला फोन केला असता त्याने भेटण्यासाठी बोलावले.भेटण्यास नकार दिला. याचा राग मात्र, तिने आल्याने आरोपीने तिला भररस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करुन लगट करण्याचा प्रयत्न करुन स्त्री मनास लज्जा
उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले.या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरली होती.मुलगी घाबरल्याचे पाहून तिच्या वडिलांनी मागील अनेक दिवसांपासून तू टेन्शनमध्ये का आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितले.
त्यांनी आरोपीच्या नंबरवर फोन केला
असता, त्याने मुलीच्या वडिलांना देखील
शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देवकर करीत आहेत.
No comments:
Post a Comment