धक्कादायक..पत्नीने सोडचिठ्ठी दिल्यानंतर
प्रेमप्रकरणातून दुसरा विवाह करून घराजवळच संसार थाटल्याच्या रागातून त्या दोघांचा निर्घृण खून..
सांगली:- प्रेम विवाह, अनैतिक संबंध त्यातून होणाऱ्या घटना पाहता क्राईम वाढत चाललेला असल्याचे दिसत असल्याचे उदाहरणे पुढे येत आहे, नुकताच पत्नीने सोडचिठ्ठी दिल्यानंतर
प्रेमप्रकरणातून दुसरा विवाह करून घराजवळच संसार थाटल्याच्या रागातून त्या दोघांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार कोकटनूर यल्लामवाडी (ता. अथणी)येथे घडला. यासीन बागोडे (वय २१) व
हीना कौसर (वय १९, रा. कोकटनूर)अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी हीनाचा पहिला पती तोफिक उर्फ बालेसाहेब शौकत केडी याला अटक
केली आहे. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत हीना कौसरचा पहिला पती तौफिक केडी याच्याशी विवाह झाला होता.परंतु, दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर सोडचिठ्ठी झाली होती. त्यानंतर हीना कौसर हिचा प्रेम प्रकरणातून यासीन बागोडे याच्याशी दुसरा विवाह झाला
होता. हीना हिने दुसरा विवाह केल्यानंतर पहिला पती तौफिक याच्या घराजवळ संसार थाटला होता. त्यामुळे तौफिक दोघांवर चिडून होता. मंगळवारी सायंकाळी त्याने मटणाच्या दुकानातील हत्याराने हीना आणि यासीन या दोघांवर हल्ला केला. यासीनची आई अमिना
बागोडे व मुस्ताक मुल्ला दोघेजण वाचवण्यासाठी धावले. तेव्हा त्याने दोघांना मारहाण केली. त्यामध्ये यासीन बागोडे यांचे आई- वडील गंभीर जखमी झाले. त्यांना मिरज येथे खासगी
रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले
आहे.दोघांची प्रकृती सुधारत आहे. घटनास्थळी ऐगळी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.पोलिस अधिकारी सुमलता आसंगी,
रवींद्र नायकवडी, विश्वनाथ जलदे यांनी
रात्रीच भेट देऊन पाहणी केली. दुहेरी खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बेळगावचे प्रभारी जिल्हा पोलिस प्रमुख बी. एन. नेमगौडा, खुनामुळे परिसरात खळबळ उडाली
आहे. घटनास्थळी बेळगावचे प्रभारी जिल्हा पोलिस प्रमुख बी. एन. नेमगौडा,अतिरिक्त पोलिस प्रमुख एम.एम.बसरगी यांनी भेट दिली. नातेवाइकांची विचारपूस केली. या दुहेरी खुनाचा
खोलवर तपास करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment