सामाजिक सभागृह व व्यायामशाळा
भूमिपूजनाचा कार्यक्रम आमराई भागातील
भीमनगर येथे संपन्न
बारामती :- बारामती शहरातील आमराई भागातील भीमनगर येथील सभामंडप व
व्यायामशाळा या कामाचे भूमिपूजन
टेक्स टाईल पार्कच्या अध्यक्षा
सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते पार
पडले या वेळी ज्येष्ठ नगरसेवक
किरणदादा गुजर, सचिन सातव,
जयदादा पाटील, अनिता
गायकवाड, अभिजित जाधव, नवनाथ
बल्लाळ, अनिता जगताप, रेश्मा शिंदे,
कल्पना शेलार, सोमनाथ रणदिवे,
संतोष वाघमारे, दिनेश जगताप, सुरेश
शेलार, अभिजित कांबळे, उत्तम
धोत्रे, करण सोनवले, सतिश खुडे, शब्बीर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून भीमनगर येथील
नागरिकांची मागणी होती स्थायी
समिती ध्यानमंडप दुरुस्ती ठराव
झाला होता परंतु स्थानिक
नागरिकांची मागणी होती की
त्याठिकाणी भव्य दिव्य सभामंडप
व्हावे जेणेकरून तेथे सामाजिक
कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंतीचे
कार्यक्रम घेता येतील तसेच मयुरी
शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेले
व्यायामाचे साहित्य याचाही वापर
होईल म्हणून स्थानिक नगरसेविका मयुरी शिंदे यांनी सर्वसाधारण सभा
क्र.४ दि.६/१/२०२१ रोजी ऑनलाईन
मीटिंगमध्ये हा विषय मांडला. जेष्ठ
नगरसेवक किरणदादा गुजर यांनी
जिल्हा नियोजन समिती महाराष्ट्र
सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेतुन
निधी उपलब्ध करून ७८ लाख
रुपयांचे काम मार्गी लावण्यास मदत
करून कामाचे भूमिपूजन सुनेत्रावहिनी
पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने
भीमनगर येथील रहिवासी उपस्थित
होते. वैशाली घोरपडे, साक्षी रणदिवे,
वंदना मिसाळ, रेखा वाघमारे, संगीता
रणदिवे, प्रमोद वाघमारे, दत्तात्रेय
रणदिवे, सुनील लोंढे, विनोद शिंदे,
नितीन खरात, सागर रणदिवे, अक्षय
खरात, प्रफुल्ल वाघमारे, रिंकू चव्हाण,
आप्पा गायकवाड, भैय्या ठोंबरे
उपस्थितांचे स्वागत स्थानिक
नगरसेविका मयुरी शिंदे व बिरजू
मांढरे यांनी केले.
No comments:
Post a Comment