बारामती शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.. शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा पोलीसांनी तात्काळ लावला शोध.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 8, 2024

बारामती शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.. शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा पोलीसांनी तात्काळ लावला शोध..

बारामती शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.. शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा पोलीसांनी तात्काळ लावला शोध..
बारामती:-काल दिनांक ०७.०२.२०२४ रोजी सकाळी १० वा सुमारास वारामती शहरातील शाहू हायस्कूल मध्ये शिकणा-या चार अल्पवयीन मुली १३ ते १५ वर्षे वयाच्या हया घरी आल्या नाहीत म्हणुन त्यांचे पालकांनी रात्री ९.०० वा बारामती शहर पोलीस स्टेशन येथे येवून चारही अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले अशी माहीती देताच पोलीसांनी सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवून लागलीच तपास सुरू करून बारामती पोलीसांनी तांत्रीक विश्लेषणाचे आधारे सदर मुलींची माहीती घेवून सदरच्या मुली पुणे स्टेशन परिसरात आहेत अशी तांत्रीक दुष्टया माहीती मिळवुन पुणे शहर बंडगार्डन पोलीसांशी संपर्क केला व वंडगार्डन पोलीसांनी एक तासात म्हणजे १0.00 वा सदर मुलींना ताब्यात घेतले व लागलीच बारामती पोलीसांनी त्या चारही मुलींना बारामती येथे सुखरूप आणले व त्या मुलींना पालकांचे ताब्यात दिलेले असून त्याबाबत पालकांनी पोलीसांचे आभार मानलेले
आहेत.सदर कार्यवाही मध्ये  श्री पंकज देशमुख  पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, श्री संजय जाधव
अपर पोलीस अधिक्षक बारामती,श्री श्रीकांत पाडूळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व अमंलदार
श्रीकांत गोसावी,बापू इंगोले यांनी सदरची चांगली कामगीरी केलेली आहे .

No comments:

Post a Comment