हादरवणारी घटना.. अनैसर्गिक शरीरसंबंधांना
नकार दिल्याने 12 वर्षीय दिव्यांग मुलाची दोन
भावांकडून निर्गुण हत्या.!
ठाणे:-मानवी विकृती वाढत चालली असून वाईट प्रऊतीच्या विचाराला आळा कधी बसेल का अशी प्रतिक्रिया उमटत असतानाच नुकताच हादरवणारी घटना घडली ठाणे शहर पोलिसांनी
शनिवारी रात्री 2 भावांना अटक केली आहे. या दोघांनी तळोजा परिसरामधील एका 12 वर्षीय दिव्यांग मुलाची निघृणपणे हत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव रमझान शेख आणि मोहम्मद शेख
अशी आहेत. रमझान हा 20 वर्षांचा असून मोहम्मद 30 वर्षांचा आहे. डायघर येथील ठाकुरपाडा भागात राहणाऱ्या या दोन्ही भावांनी त्यांच्या शेजारी राहत असलेल्या चिमुकल्याची हत्या केली. रमझानने शेजारच्या घरात राहणाऱ्या या 12 वर्षीय मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य आणि बलात्कार करण्याच्या उद्देशाने निर्जनस्थळी नेलं. मात्र आपल्याबरोबर काहीतरी वाईट करण्याचा या इसमाचा इरादा असल्याचं लक्षात आल्यानंतर या मुलाने विरोध करण्यास सुरुवात केली.
संतापलेल्या रमझानने हा मुलगा घरी गेल्यानंतर घडलेल्या प्रकारासंदर्भात वाच्यता करेल या भीतीने डोक्यात दगड घालून या मुलाला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने मुलाचा
मृत्यू झाला आहे की नाही हे तपासून पाहताना पुन्हा जोरात त्याचा गळाही दाबला. मात्र हा मुलगा मेला आहे की नाही हे कळत नसल्याने रमझानने त्याच्या भावाला म्हणजेच मोहम्मदला घटनास्थळी बोलावून घेतलं,मोहम्मद घटनास्थळी आल्यानंतर त्याने या मुलाचे हातपाय बांधले आणि त्याला जवळच असलेल्या पाण्याच्या
डबक्यामध्ये प्राण सोडेपर्यंत बुडवून ठेवलं. दरम्यान दुसरीकडे या मुलाच्या आईने मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे तक्रार डायघर पोलिसांकडे दाखल केली. डायघर पोलिसांनी या मुलाचा शोध सुरु केला मात्र
त्यांना यात सुरुवातीला यश आलं नाही, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.दोघांनी दिली गुन्ह्याची कबुली मात्र, डायघर पोलीस क्षेत्राच्या हद्दीला लागूनच असलेल्या तळोजा पोलिसांना डायघर पोलिसांनी दिलेल्या माहितीशी सादधर्म्य साधणाऱ्या शरीरयष्टीचा लहान मुलाचा मृतदेह
सापडला. यासंदर्भात तळोजा पोलिसांनी डायघर
पोलिसांना माहिती कळवली. चाचपणी केल्यानंतर जो मुलगा बेपत्ता झाला होता त्याचाच हा मृतदेह असल्याचं निश्चित झालं.तपासादरम्यान या मृत मुलाच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या 8 जणांची चौकशी करण्यात आली. त्यादरम्यान या दोन्ही भावांचे जबाब एकमेकांशी विसंगती असणार होते. त्यामुळेच पोलिसांनी या दोघांची
कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल करत घडलेला घटनाक्रम सांगितला,असं बुसरे यांनी दिलेल्या माहितीत सांगितलं. या
प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास चालू आहे.अशी माहिती
डीसीपी (झोन-1) सुभाष बुरसे यांनी दिली.
No comments:
Post a Comment