बारामतीत शिवजयंती 28 मार्च 2024 रोजी होणार पारंपरिक पद्धतीने साजरी...
बारामती:- शिवजयंती उत्सव समिती ला 40 वर्ष पूर्ण होत असुन त्यानिमित्त या वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन समितीने केले आहे त्यामध्ये मोफत शिवकालिन मोडी लिपी प्रशिक्षण दि .17 ते 25 मार्च जिजाऊ भवन श्रीराम नगर या ठिकाणी, रांगोळी स्पर्धा दि .23 रोजी सातव शाळा कसबा या ठिकाणी तसेच चित्रकला स्पर्धा ,शिवकालिन शस्त्र प्रदर्शन दि .23 व 24 रोजी नटराज नाट्य कला मंदिर येथे श्री पांडुरंग बलकवडे यांचे जाहीर व्याख्यान दि .24 रोजी आयोजित केले आहे तसेच 28 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता शिवाजी महाराज उद्यान कसबा येथून DJ विरहित भव्य पारंपरिक मिरवणूक निघणार आहे घोडे ,उंट ,ढोल ,ताशा ,बॅंड ,लाठी -काठी ,मल्लखांब ,गोंधळी न्रुत्य ,पोतरज न्रुत्य ,लेझिम व इतर मर्दानी खेळ या मिरवणुकीत असणार आहे तरी बारामतीकर शिवप्रेमी जनतेने यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे .असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सुनिल (आण्णा )शिंदे ,हेमंत नवसारे ,संभाजी माने ,संदीप मोहिते ,सागर खलाटे ,राहुल शेंडगे ,बंटी कदम ,पितांबर सुभेदार ,रोहन शेरकर इत्यादी सदस्यांनी केले.
No comments:
Post a Comment