*महिला पोलीस कर्मचाऱ्यास शस्त्रक्रियेसाठी 50 लाखांची वैद्यकीय मदत मंजूर!*
रुग्ण हक्क परिषदेच्या पाठपुरा - प्रयत्नास यश!
पुणे - स्मिता श्यामराव किरतकर या पुणे शहर पोलीस दलात, वाहतूक विभागात काम करत असलेल्या पोलीस शिपाई महिलेला श्वसन विकार झाला. यामध्ये स्मिता किरतकर यांचे फुफुस निकामी झाले. फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलने त्यांना सुमारे 50 लाख रुपयांचे बिलाचे अंदाजपत्रक दिले.
50 लाख रुपये कुठून उभे करायचे? 50 लाख रुपये भरल्याशिवाय शस्त्रक्रिया होणार नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना महिला पोलीस शिपाई स्मिता किरतकर व त्यांचे भाऊ समाधान किरतकर यांनी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची भेट घेतली.
उमेश चव्हाण यांनी मुंबई मंत्रालय येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधी व न्याय विभागातील विशेष अधिकारी श्री. रामेश्वर नाईक यांच्या पुढाकारातून आज सदर महिलेचे गृह विभागा अंतर्गत विशेष बाब म्हणून संपूर्ण पन्नास लाख रुपये बिलाची रक्कम आज मंजूर करण्यात आली. यामुळे स्मिता किरतकर यांच्यावरील शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे.
याकामी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, माजी आमदार बापूसाहेब पठारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम, सामाजिक कार्यकर्ते अमोलजी शुक्ला, याकामी पुणे ते मुंबई असा तीनदा मंत्रालय प्रवास करणारे रवींद्र अण्णा चव्हाण, परिषदेच्या अपर्णा मारणे साठ्ये, मा. सहाय्यक पोलिस आयुक्त बरकत मुजावर सर, अमित डांगे, नितीन चाफळकर आणि राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे मुख्य अधिकारी श्री रामेश्वर नाईक साहेब यांचे विशेष आभार.
अधिक माहितीसाठी संपर्क -
रुग्ण हक्क परिषद केंद्रीय कार्यालय - 136, दुसरा मजला, माती गणपती जवळ, सिताफळ बाग कॉलनी, नारायण पेठ, पुणे - 411030
फोन - 8806066061
No comments:
Post a Comment