नारी शक्ती वंदन कार्यक्रमास महिलांनी घेतला उत्स्फूर्त पणे सहभाग..
बारामती:-नुकताच 'नारी शक्ती वंदन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी बारामती येथील हॉल मध्ये मोठ्या स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह भाषण दाखविण्यात आले त्याचबरोबर मोदी सरकारच्या महिलांसाठी असणाऱ्या लाभदायक योजनेचा आढावा दाखविण्यात आला व त्यासंबंधी माहिती दाखविण्यात आले, महिला सक्षमीकरण करण्यासाठी सतत मोदी सरकार प्रयत्न करीत असताना त्याचा लाभ घेणे गरचेचे आहे,यासाठी बारामतीत 'नारी शक्ती वंदन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला याला महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन माहिती समजून घेतली यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा पिंकीताई मोरे,सौ.सारीका आटोळे अध्यक्ष भाजप महिला मोर्चा बारामती तालुका महिला अध्यक्षा,सारिका लोंढे विधानसभा भाजप,शिला पवार सरचिटणीस,सविता पवार बारामतीशहर अध्यक्षा, दिव्या कोकरे तालुका उपाध्यक्षा भाजप व इतर महिला वर्ग बारामती नगर परिषद कर्मचारी अधिकारी व जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी संतोष जाधव, किसान मोर्चा तालुका कोषाध्यक्ष बापू लोखंडे सह अनेक जण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment