बापरे.. घडय़ाळऐवजी दुसरे चिन्ह वापरा! सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला चपराक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 15, 2024

बापरे.. घडय़ाळऐवजी दुसरे चिन्ह वापरा! सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला चपराक..

बापरे.. घडय़ाळऐवजी दुसरे चिन्ह वापरा! सर्वोच्च
न्यायालयाची अजित पवार गटाला चपराक..

नवी दिल्ली : मतांसाठी त्यांच्या नावाचा वापर का करता,अशा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला गुरुवारी खडसावले.शरद पवार हे उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यापासून तुमची वाट वेगळी आहे, पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास मज्जाव
करतानाच निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर निर्णय येईपर्यंत 'घडय़ाळ' ऐवजी दुसरे चिन्ह वापरण्याची तोंडी सूचनाही न्यायालयाने केली. यासंदर्भात
सर्वोच्च न्यायालय मंगळवारी आदेश देण्याची शक्यता आहे.शरद पवार यांचे छायाचित्र व नावाचा वापर करणार नाही,असे बिनशर्त प्रतिज्ञापत्र शनिवापर्यंत देण्याचे आदेशही
सर्वोच्च न्यायालयाने दिले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही अजित पवार गटाला मोठी चपराक मानली जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा झालेला अजित पवार गट
महायुतीत सहभागी झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत किमान चार जागा तरी हा पक्ष लढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाने शरद पवार यांचे नाव, छायाचित्र तसेच घडय़ाळ चिन्हाचा वापर
करू नये, असे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर न्या. सूर्य कांत व न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अजित पवार यांचे वकील मिनदर सिंह यांना
परखड प्रश्न विचारले. 'तुम्हाला इतकाच आत्मविश्वास असेल तर स्वत:ची छायाचित्रे का वापरत नाही. तुमचे मार्ग आता वेगवेगळे झाले आहेत. आता तुम्ही स्वत:च्या प्रतिमेचा वापर करा,' असे न्या. कांत यांनी अजित पवार
गटाला सुनावले. त्यावर आपला बचाव करताना मिनदर सिंह 'काही कार्यकर्त्यांनी तसे केले असेल,' असा युक्तिवाद केला. मात्र, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा संदर्भ दिला. ग्रामीण भागांतील मतदारांना
आकर्षित करण्यासाठी घडय़ाळ या निवडणूक चिन्हाचा तसेच, शरद पवार यांच्या छायाचित्राचा वापर करा, असे आदेश भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सिंघवी यांनी न्यायालयाला दिली. त्यावर,समाजमाध्यमांवरून शरद पवारांच्या नावाचा व छायाचित्रांचा वापर रोखता येणे शक्य नाही, असे मुद्दावकील मिनदर सिंह यांनी उपस्थित केला. मात्र न्या. कांत
यांनी हे म्हणणे पूर्णपणे फेटाळून लावले. कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे तुमचे काम आहे, अशी खरमरीत टिप्पणी त्यांनी केली. तसेच पवार यांचे नाव व छायाचित्र वापरणार नाही, अशी लेखी हमी बिनशर्त प्रतिज्ञापत्राद्वारे शनिवापर्यंत
सादर करण्याचे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह या दोन्ही गोष्टी शरद पवार यांच्याशी खूप वर्षांपासून जोडलेल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये
मतदार घडय़ाळ चिन्हाकडे बघून मतदान करण्याची शक्यता आहे. त्याचा राजकीय फटका शरद पवार गटाला बसू शकतो. त्यामुळे घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह वापरण्यास अजित पवार गटाला मनाई करावी, अशी मागणी सिंघवी यांनी केली. त्याला अजित पवार गटाने आक्षेप घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला अधिकृत पक्ष आणि चिन्ह बहाल केल्याचे अजित
गटाच्या वकिलांनी म्हटले. मात्र, हा मुद्दादेखील न्या. कांत यांनी फेटाळला. आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल अमान्य केला तर तुम्ही (अजित पवार गट) काय करणार? निवडणुकीच्या मध्यावर आम्ही आयोगाचा
निकाल रद्द केला तर काय? त्यामुळेच अजित पवार गटाने दुसरे चिन्ह वापरावे, असे आम्ही सुचवतो,' असे न्या. कांत यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्या नावाच्या वापराला जबाबदार कोण? त्यांच्या छायाचित्रांचा वापर न करण्यास तुम्ही तुमच्या सदस्यांना सांगा. आता तुम्हा दोघांचे (गट) वेगळे अस्तित्व आहे. तुम्हीच शरद पवारांपासून वेगळे होणे निवडले आहे.आता त्या निर्णयाशी कायम राहा.असेही न्या. सूर्य कांत म्हणाले.

No comments:

Post a Comment