बारामतीत भाजपच्या नाराज महिला राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटात;पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 18, 2024

बारामतीत भाजपच्या नाराज महिला राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटात;पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड..

बारामतीत भाजपच्या नाराज महिला राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटात;पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड..
 बारामती:- पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष
या पदावर बारामती ग्रामीण मधून सौ.वर्षा संदीप भोसले व बारामती शहरातून पल्लवी वसंत वाईकर यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्रजी पवार,राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती
फौजियाताई खान, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष, मा. श्री. जयंतराव पाटील,
प्रदेशाध्यक्षा,मा.सौ. रोहिणीताई खडसे यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल.पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यसाठी पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.सौ. भारती युवराज शेवाळे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष यांनी निवड केलेले पत्र खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी मा. नगरसेवक सौ. वनिता बनकर हे उपस्थित होते.वर्षा भोसले व पल्लवी वाईकर ह्या भारतीय जनता पार्टी च्या बारामती तालुक्याच्या महिला मोर्चा अध्यक्ष व विधानसभा संयोजिका या महत्वाचे पदावर काम करीत होते,पक्षात घुसमट होत असल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटात नुकताच प्रवेश केला होता.

No comments:

Post a Comment