बापरे... महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्याचा धारदार हत्याऱ्याने वार करून खून. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 2, 2024

बापरे... महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्याचा धारदार हत्याऱ्याने वार करून खून.

बापरे... महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्याचा धारदार हत्याऱ्याने वार करून खून.
दौंड :-गुन्हेगारी वाढत चालली असली तरी कारवाई देखील होत आहे, मात्र त्यातूनही खून, खुनासारखे प्रयत्न,मारामाऱ्या असे प्रकार  घडत असल्याचे दिसत आहे, नुकताच बारामती लोकसभा मतदार संघातील  दौंड तालुक्यातील वासुंदे येथे दि.01/02/2024 रोजी रात्री 07/45 च्या सुमारास इंडीयन ऑईल पंपांचे समोर महाराष्ट्र बँकेतील अधिकारी प्रवीण मळेकर यांचा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार करून
खून करण्यात आल्याची गंभीर घटना घडली
आहे. याबाबत केश प्रवीण मळेकर यांनी
फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश मळेकर यांचे वडील दिनांक 01/03/2024 रोजी सकाळी 09:15 च्या सुमारास हिरो होन्डा पँशन मोटारसायकल नंबर MH 12 EP 9336 हीवरुन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बारामती या बँकेचे रिकव्हरीचे नोटीस वाटप करण्यासाठी राहते घरातुन बारामती परिसरात गेले होते. फिर्यादी यांना एकाने फोन करुन कळविले की,मळेकर तुमचे कोण आहेत त्यांना कोणीतरी चाकु मारला आहे व ते जखमी अवस्थेत रोडवर पडलेले आहेत. त्यांना विश्वराज हॉस्पीटल लोणी काळभोर या दवाखान्यात अँम्बुल्नसमधुन पाठवुन देत आहे तुम्ही तेथे जावुन थांबा असे सांगितले.त्यांनतर फिर्यादी यांनी फोनवर फोन करुन सदरचा प्रकार हा कोठे झाला याबाबत विचारले सह्या असता त्यांनी सदरचा प्रकार वासुंदे गावचे हद्दीत इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाचे समोर बारामती फलटण रोडवर झाला असल्याचे सांगितले. रात्री 09:05 च्या सुमारास विश्वराज हाँस्पीटल येथे फिर्यादी पोहचले त्यांनतर रात्री 09:15 वा.चे सुमारास फिर्यादी यांचे वडील प्रविण मळेकर यांना पाहीले त्यावेळी त्यांचे पोटात कोणीतरी हत्याराने भोकसल्याने त्यांचे पोटातील आतड्या बाहेर आलेल्या दिसल्या व पाठीवर कमरेवजवळ वार झालेले दिसले.ऋषिकेश यांनी वडीलांना हाका मारल्या असता त्यांचे कोणत्याही प्रकारे हालचाल झाली नाही त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासुन ते
उपचारापुर्वीचे मयत आहेत असे घोषीत केले.
फिर्यादी यांचे वडिलांना कोणीतरी अज्ञात
इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन
कोणत्यातरी धारदार हत्याराने भोकसुन त्यांना
जिवे ठार मारुन त्यांचा खुन केल्याने दौंड
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment