बाबो..शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून महिलेने लॉजवर युवकाचे कापले गुप्तांग - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 24, 2024

बाबो..शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून महिलेने लॉजवर युवकाचे कापले गुप्तांग

बाबो..शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून महिलेने लॉजवर युवकाचे कापले गुप्तांग..
सोलापूर:-ऐकावं ते धक्कादायक आहे, चक्क शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने एका युवकाचा गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार बार्शी तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी युवकाने दिलेल्या तक्रारीवरून महिलेवर
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित महिलेस अटक करून
न्यायालयात हजर केले असता या महिलेस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, युवकाचे मोबाइलचे दुकान आहे. संशयित आरोपी महिला या दुकानात कायम येत-जात असल्याने त्यांच्यात ओळख निर्माण झाली होती.पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. महिलेने
युवकाकडे लग्न करण्याचा हट्ट धरला. परंतु, महिला विवाहित असल्याने युवकाने लग्नासाठी नकार दिला. मात्र,संशयित आरोपी महिला ही ब्लॅकमेल करू लागली.त्यातूनच मार्च 2023 मध्ये त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस
ठाणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात युवकाला तुरुंगात जावे लागले. जवळपास दोन महिन्यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतरही तिचे ब्लॅकमेलिंग सुरूच
राहिले. दरम्यान, त्याच्या वडिलांवर आणि भावांवर देखील छेडछाडीचे गुन्हे दाखल केले. महिलेच्या त्रासाला कंटाळून ऑगस्ट 2023 मध्ये युवकाने आळंदी येथे तीच्यासोबत लग्न केले. लग्नानंतरही महिला त्याला त्रास देऊ लागली. महिलेच्या त्रासाला वैतागून युवकाने आपले राहते घर सोडून 3 महिन्यांपूर्वी तो बार्शी तालुक्यात नातेवाइकाकडे राहण्यास गेला. तेव्हापासुन
दोघातील संपर्क तुटला होता. गुरुवारी (ता. 21) पहाटे 5 वाजताच्या सुमारास या महिलेने युवकाला फोन केला.त्याला धमकी देत गुरुवारी दुपारी 2.30 वाजता बार्शी एस.टी. स्टॅन्डवर भेटण्यासाठी बोलावले. तेथून ते दोघेही
तेथील लॉजवर गेले. तेथे गेल्यावर महिलेने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. युवकाने नकार दिला, तरीही महिलेने बळजबरी त्याचे कपडे काढले. तोंडावर शर्ट टाकून अचानकपणे गुप्तांगवर चाकूने वार केले. या हल्ल्यात
युवकाला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्याने खासगी रुग्णालय गाठले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी जखमी युवकाने पोलिसात देलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महिलेविरोधात हत्येच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास
बार्शी पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment