सरकारची जबरदस्त योजना, मिळणार महिलांना
व्यवसायात आत्मनिर्भर बनवण्यासाठी २५
लाखांचं कर्ज..
मुंबई:-स्त्री शक्ती पॅकेज योजनेतून कमी दरात कर्ज दिलं जातं. जेणेकरून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून पुढे जाता येईल.ही योजना सरकारची स्त्री शक्ती योजना ही महिलांसाठीची एक वेगळ्या प्रकारची सरकारी योजना आहे. ही योजना महिला उद्योजकांना काही सवलती देऊन आधार देते.या महिला उद्योजकांना त्यांच्या राज्य सरकारच्या EDP (उद्योजकता विकास कार्यक्रम) अंतर्गत नावनोंदणी करावी.यामध्ये 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जावर काही अंशी
व्याज सवलत मिळते. केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्त्री शक्ती पॅकेज योजना सुरू केली. ज्यामध्ये देशभरातील
महिला लाभार्थी होऊ शकतात. स्त्री शक्ती पॅकेज
योजनेतून कमी दरात कर्ज दिलं जातं. ही कर्ज प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने पूर्ण केली जाते. स्त्री शक्ती पॅकेज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करू शकता.स्त्री शक्ती पॅकेज योजनेचे उद्दिष्ट स्त्री शक्ती पॅकेज योजना देशभरातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आली.
जेणेकरून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून पुढे जाता येईल.योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते? केंद्र सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्त्री शक्ती पॅकेज योजनेंतर्गत महिला जास्तीत जास्त 25 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात.यामध्ये बँकेने निकष लावले आहेत. कर्ज घेणाऱ्या महिलेकडे व्यवसायात किमान ५० टक्के मालकी असावी
लागते.स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत सवलती
2 लाखांपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या महिलांसाठी व्याजदर स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत सवलती देत 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या महिलांसाठी व्याजदर 0.5 टक्क्यांनी कमी केला जातो. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये नोंदणी केलेल्या कंपन्यांसाठी कर्ज मर्यादा 50
हजार रुपयांपासून 25 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. स्त्री शक्ती पॅकेज योजने अंतर्गत फक्त पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी व्याज आकारले जाईल. 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा हमी देण्याची गरज नाही. स्त्री शक्ती पॅकेज योजनेच्या माध्यमातून उद्योजक महिलांची संख्या वाढत आहे.योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
• आधार कार्ड,
• मतदार ओळखपत्र,
• बँक खाते तपशील,
.ई - मेल आयडी,
.मोबाईल नंबर,
• व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे.
No comments:
Post a Comment