बारामती नगरपरिषदेची वसुली मोहिम–कारवाईस सुरवात सात दुकाने सील, ६५ नळजोड बंद... - vadgrasta

Post Top Ad

Saturday, March 30, 2024

बारामती नगरपरिषदेची वसुली मोहिम–कारवाईस सुरवात सात दुकाने सील, ६५ नळजोड बंद...

बारामती नगरपरिषदेची वसुली मोहिम–कारवाईस सुरवात सात दुकाने सील, ६५ नळजोड बंद..
बारामती:-बारामती नगर परिषदेने सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. संपूर्ण शहरामध्ये वसुली पथक व जप्ती पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे.
नगरपरिषदेच्या जप्ती पथकाने आत्तापर्यंत ७ व्यावसायिक दुकान गाळे सील व ६५ घरगुती नळ जोड कनेक्शन बंद केली आहेत. थकबाकीदारांनी जप्ती कारवाई टाळण्यासाठी थकवाकी त्वरीत भरावी असे आवाहन वारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे यांनी केले आहे.ज्या मालमत्ताधारकांनी सन २०२३ - २४ ची मागणी विले भरली नसतील त्यांनी आपली नवीन QR कोड असलेल्या
घरपट्टी पावती वरील आपला कर ऑनलाइन पेमेंट करण्याकरीता ऑनलाईन वेबसाईटद्वारे https://baramalimc.org किंवा मोबाईल अॅपद्वारे (BRM TAX APP डाउनलोड करण्यासाठी https://tinyurl.com/Baramnalimc ), संगणकीकृत नागरी सुविधा केंद्राद्वारे POS मशिनद्वारे कर भरणा करु शकता. तसेच RTGS/NEFT व प्रत्यक्ष नगरपरिषदेत रोख किंवा CR कोड SCAN करुन भरणा करणेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
जे मालमत्ताधारक मुदतीत कर भरणा करणार नाहीत अशा मालमत्तावर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदी नूसार मालमत्ता सिलकरणे, मालमत्ता जप्त करणे. नळजोड खंडीत
करणे आदी स्वरुपाची कारवाई करणेची मोहिम सुरु आहे. बारामती नगरपरिषद तसेच चांकामध्ये फ्लेक्स लावून संबंधित थकबाकी दारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. कर वसुली हा नगरपरिषदेचा उत्पन्नाचा महत्वाचा भाग असून या माध्यमातून आलेल्या निधीतूनच विविध विकास कामे मार्गी लावली जातात. त्यामुळे नागरीकांनी वेळीच कर भरुन
नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे. तसेच कर भरणा करणेसाठी ३१ मार्च पर्यंत सुट्टीचे दिवशी देखील वसुलीचे कामकाज सुरु राहणार आहे. तरी याची सर्व नागरीकांनी नोद घ्यावी. ३१ मार्च नंतर जे थवाकीदार घरपट्टी भरतील त्यांच्या
कडून नियमाप्रमाणे दंडात्मक रक्कमेसह वसुली केली जाईल. तरी सर्व मिळकत धारकांनी आपलेकडील घरपट्टी पाणीपट्टी व जागाभाडेचा भरणा करुन कटु कारवाई टाळावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment