कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बारामतीत कॉलेज परिसर नजीक पोलीस चौकी चालू करण्याची होतेय मागणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 4, 2024

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बारामतीत कॉलेज परिसर नजीक पोलीस चौकी चालू करण्याची होतेय मागणी..

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बारामतीत कॉलेज परिसर नजीक पोलीस चौकी चालू करण्याची होतेय मागणी..
बारामती:-बारामतीत विकास झपाट्याने वाढत असताना काही कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री,गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले मोठया थाटामाटात सजवलेल्या बारामती बस स्थानक,पोलीस उपमुख्यालय, पोलीस स्टेशन  यांची ऑनलाइन उद्घाटन केली याबाबतीत बारामतीकरानी आभार मानले कौतुक केले,पण हे सर्व होत असताना बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ देखील वाढविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे बारामती शहराची वाढती व्याप्ती पाहता व वाढती गुन्हेगारी याला आळा घालण्यासाठी पोलीस संख्याबळ देखील वाढविणे गरजेचं असून सद्या पोलीस स्टेशन बारामतीच्या एका साईटला गेल्याने तांदुळवाडी रोड, वसंतनगर,टी सी कॉलेज परिसर, प्रगतीनगर सारख्या लांब अंतर असणाऱ्या लोकवस्ती नजीक  छोटी पोलीस चौकी होणे अंत्यत गरजेचे आहे कारण या भागात क्राईम वाढत असून याभागात शाळा, कॉलेज असल्याने नेहमीच काहींना काही वाद घडत असतात तसेच हुल्लडबाजी करणारे युवक कर्कश आवाजात चालवीत असणारे बुलेट गाड्या यामुळे या भागात राहणारे रहिवाशी त्रस्त झाले असून अश्या आवाजामुळे छातीत धडकी भरेल असा आवाज करून चालविनाऱ्या रोड रोमियोवर कडक कारवाई होणं गरजेचं झालंय तसेच व्यसनाधीन तरुणाईमुळे रहिवाशांना नीटनेटकी झोप मिळत नाही तर रात्र झाली की गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण विनाकारण गोंधळ घालत फिरत असतात त्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण होत चालले असल्याचे नागरीक बोलत आहे, यासाठी कॉलेज परिसरात असणारे पोलीस चौकी चालू करून कायम बदली पोलीस असावेत जेणे करून धाक राहील व कुणाला तक्रार करायची असल्यास याठिकाणी असणाऱ्या पोलीस चौकीला जातील यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीसाची संख्याबळ वाढविण्यासाठी लेखी मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment