बारामतीत लाठ्या काठ्या आणि गजानं बेदम मारहाण प्रकरणातील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू..
बारामती:- बारामतीत गेल्या अनेक महिन्यापासून काहींना काही घटना घडत असल्याचे दिसत असल्याने गुन्हेगारी किती वाढलीय याचा प्रत्यय येत असल्याचे दिसत आहे, विनयभंग, बलात्कार, मारहाण, खून यासारखे घटना घडल्याचे समोर येत असताना नुकताच शहरात काही दिवसांपूर्वी मारहाणीचा घटना घडली होती. एका हॉटेल मध्ये तरुणाला लाठ्या काठ्या आणि गजानं बेदम मारहाण करण्यात आली होती, या घटनेत गंभीर
जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याचा मृत्यू झाला असून अनिकेत धोत्रे असं या मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमान्यासातून ही घटना घडल्याची माहिती
समोर आली आहे, दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment