सावधान..नागरिकांच्या अंगावर पाण्याचे फुगे फोडणे पडेल महागात,पालकांना खावी लागेल तुरुंगाची हवा.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 29, 2024

सावधान..नागरिकांच्या अंगावर पाण्याचे फुगे फोडणे पडेल महागात,पालकांना खावी लागेल तुरुंगाची हवा.!

सावधान..नागरिकांच्या अंगावर पाण्याचे फुगे फोडणे पडेल महागात,पालकांना खावी लागेल तुरुंगाची हवा.!
पुणे:-रंगपंचमी हा उत्सव आनंदाने साजरा करीत असताना साधा रंग वापरून खेळायला हवा, कारण बाजारात केमिकल मिश्रण केलेला रंग आला असून त्यामुळे साईट इफेक्ट होऊ शकतो तर दुसरीकडे रंगाने भरलेले फुगे अंगावर फेकून मारणे देखील धोक्याचे झाले आहे,पोलिसांची नजर याकडे असून मुलाच्या पालकांवर गुन्हे होणार दाखल असल्याने सावध रहा कारण नुकताच नागरिकांच्या अंगावर पाण्याचे फुगे फोडून हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांच्या पालकांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली आहे. अल्पवयीन मुलांचे पालक रंगास्वामी मग अण्णा गौडा (वय55, रा. हडपसर), (Pune) धोंडीराम मच्छिंद्र आखाडे(वय 45 वर्ष, रा. कागदी पुरा कसबा पेठ) यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार फिर्याद देण्यात आली आहे.
पुढील कारवाई करण्यासाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी नागरिकांवर दुचाकीस्वार मुलांनी फुगे फेकले होते. गुन्हे शाखा युनिट
एकचे पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे आणि शशिकांत दरेकर यांनी शिवाजीनगर आणि डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीसीटिव्ही कॅमेरे पडताळून कसबा पेठ परिसरातील दोन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर मोटर
वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद,सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक रमेश तापकीर, पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, शशिकांत दरेकर, शुभम देसाई, महेश बामगुडे, निलेश साबळे, राहुल
मखरे, अनिकेत बाबर, आय्याझ दड्डिकर, महेश सरतापे यांनी केली.

No comments:

Post a Comment