अबब..बारामतीत नक्की चाललंय काय, चक्क डॉक्टर कडून नर्स महिलेवर बलात्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 6, 2024

अबब..बारामतीत नक्की चाललंय काय, चक्क डॉक्टर कडून नर्स महिलेवर बलात्कार..

अबब..बारामतीत नक्की चाललंय काय, चक्क डॉक्टर कडून नर्स महिलेवर बलात्कार..
बारामती:- बारामती शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टर कडून नर्स महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या घटनेमध्ये  फिर्यादी 34 वर्षीय महिले कडून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यात आलेली आहे. सदर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून व पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशन येथे.डॉक्टर विरोधात भा.द.वि कलम 376-क (ड),376(2) (एन), 498,323,506.या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहे.महिला पीडिते कडून फिर्यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे महिलेला डॉक्टर कडून वारंवार त्रास दिला जात असल्याचे व डॉक्टरने खोटे अमिष दाखवून.. तुझ्याशी मी लग्न करणार आहे.असे म्हणून डॉक्टरने वेळोवेळी स्वतःच्या घरी घेऊन जाऊन पीडित महिलेवर तिच्या मना विरुद्ध अतिप्रसंग केला असल्याचे महिले कडून फिर्यादीमध्ये सांगण्यात आलेली आहे. पीडित महिलेने डॉक्टरला लग्न कधी करणार आपण या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टरने पीडित महिलेला जिवे मारण्याची देखील बऱ्याचदा धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये महिलेने सांगितले आहे. त्यामुळे बारामती शहर पोलीस स्टेशन येथे 34 वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सदर आरोपी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या घटनेमुळे बारामती शहर व तालुका येथे कार्यरत असलेल्या सर्वच हॉस्पिटल मधील महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.आपल्या कुटुंबाच्या अडचणींमुळे तसेच स्वतःचे करियर घडावे म्हणून नर्सिंग कोर्सेस केलेल्या महिला व मुली या सर्रास हॉस्पिटलमध्ये..कुठे पारीचारीका म्हणून तर कुठे नर्स म्हणून काम करत असतात. यामध्येच काही डॉक्टर लोकांकडून महिला व मुलींचा.अशा काही नीच वृत्तीच्या डॉक्टर लोकांकडून मजबुरीचा गैरफायदा घेतला जातो. आणि हे बऱ्याचदा आपण घडलेले असे प्रकार वृत्तपत्र वाचले देखील असतील... यासाठी अशी कृत्य करणाऱ्या डॉक्टर असतील किंवा तेथे कार्यरत असलेले कर्मचारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.असे मत हॉस्पिटल परिसरात असलेल्या काही नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे,या धक्कादायक घटनेची पोलीस अधिक तपास करीत आहे.तर नुकताच काही दिवसांपूर्वी  एका वयोवृद्ध डॉक्टर कडून तरुणी महिलेला घेऊन अशील चाळे करण्याचा उद्देशाने बाहेर गावी नेले असता त्यामध्ये काय गौडबंगाल झाले हे लवकरच प्रसिद्ध होणार असून याबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम चालू असून 'तरण्याचं झालं कोळसे, म्हाताऱ्याला आलं बाळासं' या सदराखाली लवकरच माहिती समोर येईलच, पण ज्याच्यावर विश्वास ठेवून पेशंट डॉक्टर कडे येतो त्या डॉक्टर चे असे चाळे चालू असेल तर काय समजावे, खरंतर महिला सुरक्षित नाही किंवा आर्थिक लोभापायी महिला ब्लॅक मेल करतात हे सिद्ध होणे गरजेचे आहे.***

No comments:

Post a Comment