ग्रामपंचायतीनी वार्षिक आराखड्यात वृत्तपत्र खरेदीसाठी १० हजार रूपयांची तरतूद करावी
- राज्य अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष .
वसंत मुंडे यांनी मांडलेले ठराव सर्वानुमते मंजुर
पुणे : (प्रतिनिधी)चिंचवड- पुणे येथे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या राज्यव्यापी अधिवेशनात प्रत्येक ग्रामपंचायतीनी वार्षिक आराखड्यात वृत्तपत्र खरेदीसाठी १० हजार रूपयांची तरतूद करावी, आणि पारदर्शक कारभारासाठी जिल्हा व तालुका विविध शासकीय समित्यांमध्ये पत्रकारांना सदस्य नियुक्ती द्यावी.यासह अनेक महत्त्वपूर्ण ठराव प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मांडले, ते ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य पातळीवरील अधिवेशन चिंचवड- पुणे येथे मोठ्या थाटात पार पडले. या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अधिवेशनाच्या खुल्या सत्रात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मांडलेले महत्वपूर्ण ठराव टाळ्यांच्या गजरात हात उंच करून उपस्थित 2000 पत्रकारांनी मंजूर केले. यात महाराष्ट्र सरकारने
बाळशास्त्री जांभेकर सन्मान ( पेन्शन ) योजनेत महिना अकरा हजारहून २० हजार रुपयांची तरतूद केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करणारा ठराव मांडल पहील्यांदाच मंजूर करण्यात आणि वाढती महागाई लक्षात घेऊन ज्येष्ठ पत्रकारांसाठी आजची तरतूद करण्याचा सरकारने विचार करावा अशी मागणी करण्यात आली.तर ग्रामपंचायतींनी वार्षिक आराखड्यात गाव तिथे ग्रंथालय या धोरणानुसार वृत्तपत्र खरेदीसाठी वार्षिक१० हजार रुपयांची तरतूद करावी यासाठी सरकारने आदेश करावा, ज्यामुळे राज्यातील ३०००० ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृत्तपत्रांना आर्थिक पाठबळ मिळेल. असा अत्यंत महत्त्वपूर्ण ठराव प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मांडल्यानंतर पत्रकाराने उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून हात उचलून या ठरावाला समर्थन दिले.तर वेगवेगळ्या खाजगी विमा कंपन्यांना केंद्र सरकार पॉलिसी घेतल्यानंतर उत्पन्न घरात सवलत देते. त्यास धोरणानुसार वृत्तपत्र खरेदी करणाऱ्या वाचकांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपयाची सूट द्यावी यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा.
वाढती महागाई इतर वस्तुंचे वाढलेले दर आणि जीएसटीचा अतिरिक्त बोजा लक्षात घेऊन सरकारने जाहिरातींच्या दरात वाढ करावी. विभाग, जिल्हा आणि गाव पातळीवरील छोटी वृत्तपत्र हे सर्वसामान्य माणसांचा आवाज असल्याने सरकारने या वर्तमानपत्रांना जाहिरातींचा कोटा वाढवून द्यावा. वृत्तपत्रांनी उत्पादन खर्चावर आधारित विक्री किमती वाढवाव्यात.यासाठी पत्रकारांनी व्यापक जनजागृती मोहिम हाती घ्यावी.अधीस्विकृती मिळवण्यासाठीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात. विभागीय ,जिल्हास्तरावरील दैनिकांच्या तालुका पातळीवरील पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यात यावी. जिल्हा आणि तालुकास्तरावर म्हाडा अंतर्गत पत्रकारांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना सुरू करावी. पत्रकारांच्या मुलांना शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाच्या आणि उच्च शिक्षणासाठी परदेशात कोटा आरक्षित करावा. राज्य आणि जिल्हास्तरीय शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून पत्रकारांना प्राधान्य देत संधी द्यावी.विधान परिषद सदस्यपदी पत्रकार संघटनेमधून प्रतिनिधित्व द्यावे. असे विविध महत्त्वपूर्ण ठराव प्रदेशाध्यक्ष या नात्याने वसंत मुंडे यांनी मांडले, त्यास सर्व पत्रकार, तालुका, जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीने मंजुरी दिली.
...........
पत्रकार पेन्शन योजना निधीत वाढ
केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनात सरकारने बाळशास्त्री जांभेकर सन्मान (पेन्शन) योजनेत महिना अकरा हजारहून २० हजार रुपयांची तरतूद केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले. सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याचे स्वागतच केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली.
No comments:
Post a Comment