संयुक्त भारत पक्षातर्फे कल्याण लोकसभा मतदार संघातून संभाजीराव जाधव रिंगणात..
कल्याण(प्रतिनिधी) :- कळवा, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथे संयुक्त भारत पक्षाची ताकत वाढली असून पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या आग्रहास्तव कल्याण लोकसभा मतदार संघातून संयुक भारत पक्ष्याचे राष्ट्रीय महासचिव मा, संभाजीराव जाधव यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली आहे .
कल्याण लोकसभा मतदार संघातुन शिवसेनेचे विद्यमान खासदार मा श्रीकांत शिंदे आहेत , सध्याची महाराष्ट्रासह देशाची राजकीय परिस्थिती पाहता जनसामान्य मतदारांमध्ये मोठी निराशा आहे .
त्यातच सर्वच राजकीय पक्षांची अस्थिरता पक्षात झालेली मोठ्या प्रमाणावर फूट यामुळे नेमके सरकार कोणत्या पक्षाचे सांगणे कठीण आहे.
त्यातच आरोग्य, शिक्षण , महागाई, बेरोजगारी , व्यापार उद्योग डबघाईला आले तसेच ऊस , कापूस, सोयाबीन, गहू ,हरबरा, कांदा, फळे, दुध, इत्यादी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव न मिळाल्याने अतिवृष्टी व अवकाळी पावसाने उध्वस्त शेतकरी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या , मोठ्याप्रमाणात होणारा भ्रष्टाचार यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला असून महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा आहे.
नवा पक्ष ! नवीन विचार! घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संयुक्त भारत पक्ष उदयास आला असून महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे
संयुक्त भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष : अशोक बहादरे, कोषाध्यक्ष,: ओंकार अय्यर , यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक कमिटीने कल्याण लोकसभेसाठी संभाजीराव जाधव यांची निवड निश्चित केली आहे,संभाजी जाधव हे पश्चिम महाराष्ट्रात ला राजकीय क्षेत्रात ला अनुभवी चेहरा ,सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांशी जवळीक असल्याने त्यांना निश्चित फायदा होईल , निवडणुकीत कोण बाजी मारतो येणारा काळच ठरवेल.
No comments:
Post a Comment