बारामतीत चालुय रासरोस दारू,गुटखा,मटका..!व्यसनाधीन यांना लागलाय चटका.!!
बारामती:-गेल्या काही दिवसांपूर्वी बारामतीत अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी नव्याने पदभार स्वीकारला आणि बारामतीत रासरोस चालू असणारे अवैध धंदे बंद करण्यात आले तशी काही भागात, गावात नावापुरती कारवाई करण्यात आली परंतु ती कारवाई मूळ मालकांवर न होता कामगार, गडी, छोटे विक्रते यांच्यावर कारवाई होते, यामुळे मोठा मासा सोडून छोटे मासे गळाला लागतात आणि पुन्हा हे बडे मासे आपले अवैध धंदे रासरोस पणे तर कुठं चोरून पुन्हा चालू केल्याचे पहावयास मिळत आहे, वरीष्ठ अधिकारी यांना फक्त धंदे बंद आहेत असे अहवाल दाखवला जात आहे की काय अशी चर्चा होत आहे, मात्र बारामती शहर व तालुक्यातील अनेक गावांत सद्या अवैध धंदे जोमात चालू असून त्याचे पुरावे देखील त्याभागातील स्थानिक रहिवाशी यांना विचारल्यावर सांगतील,अवैध दारू, गुटखा,मटका हा तर सर्रास चालू आहे, ऑनलाइन मटका, मोबाईलवर घेतला जाणारा मटका हे अनेक ठिकाणी चालू असून केवळ धंदे बंद असल्याचे दिखावा सुरू असून नीरा गावातून येणारी दारू कित्येक गावात रासरोस विकली जाते, सुपे,बारामती,जेजुरी या गावातून देखील दारू सर्रास छोटया गावात, खेडेगावात, वस्तीवर विकली जात असून त्यावर कारवाई करताना ती ज्या मालकाकडून आणली त्या सप्लाय करणाऱ्या मालकांवर कारवाई करून तडीपार, मोक्का सारखे करावी करावी अशी मागणी विविध स्तरातून होत असून लवकरच याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात येणार असल्याचे कळतंय,राज्य उत्पादन शुल्क विभाग व अन्न औषध प्रशासन विभाग मात्र झोपीचं सोंग घेत आहे की काय अशी प्रतिक्रिया उमटत आहे.टपऱ्या व दुकानात गुटखा रासरोस मिळत असताना कारवाई का होत नाही हे विशेष म्हणावे लागेल.
No comments:
Post a Comment