मूक प्राणीमात्रांवर दया करणे हाच मानव धर्म - पाणवठ्यात मध्ये स्वच्छ पाणीपुरवठा करून प्राणीमात्रांवर केली दया..
बारामती:-उन्हाळ्यात वनप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्या अनुषंगाने आभाळमाया ग्रुपच्या वतीने आणि वन विभाग फॉरेस्ट एरिया बारामती मोजे कन्हेरी या वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वन विभागात पानवठे तयार केले आहेत वनप्राणी क्षेत्राच्या बाहेर जाऊ नये यासाठी ही व्यवस्था केली आहे वाढत्या उन्हामुळे प्राण्यांना पाणी मिळत नसल्यामुळे बऱ्याच जा मुक्या प्राण्यांचा दूर देवी मृत्यू देखील होतो आणि अशा कारणामुळे गावाकडील वस्त्यांकडे त्यांचे फिरणे वाढते या गोष्टीमुळे मुक्या प्राण्यांच्या जीवितस धोका निर्माण होईल याची काळजी घेत आभाळमाया ग्रुप यांच्या वतीने व उद्देशाने वन क्षेत्रात टॅंकरने स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात आला आहे. कन्हेरी वन क्षेत्रात नैसर्गिक पानवठे बनवलेले आहेत त्याचे कृत्रिम पानवठे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे पानवट्यांमध्ये भर उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे हे पानवठे वन विभाग फॉरेस्ट एरिया कन्हेरी वन प्राण्यांची तहान भागवीत आहे त्यामुळे वनप्राण्यांची भटकंती थांबली आहे असे बारामती जिल्हा पुणे कन्हेरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.आज रोजी मौजे कनेरी येथील राखीव वन क्षेत्रामध्ये टँकरद्वारे वन्य प्राण्यांसाठी पणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात आले यावेळेस वनविभागाची सौ. शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आभाळमाया ग्रुप यांच्या संस्थेच्या माध्यमातून वन्यप्राण्यांना पाणी सोडण्यात आले. प्रमुख उपस्थिती रचित मुथा पण होते. उपस्थित मान्यवर श्री. बाळासो गोलांडे वनरक्षक बारामती.श्री .हेमंत मोरे वनपाल बारामती . आभाळमाया ग्रुपचे संस्थापक सौ.अल्पा नितीन भंडारी सर्व नियोजन पहाणाऱ्या सदस्या सौ.अंजली देसाई, सौ. हेमा ओसवाल, सौ .सुनीता मोदी, सौ .नम्रता मोदी,सौ.लता ओसवाल,सौ.शितल गुंदेचा, सौ.अर्चना भंडारी, वनविभागात रात्रीच्या काळोखात वाट दाखवणारे श्री. अनिल काळोखे वॉचमेन काका, श्री हरिभाऊ मासाळ वॉचमेन काका, श्री गणेश कोरे वॉचमन काका, बारामती इत्यादी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी साथ दिली.
No comments:
Post a Comment