दादा आपण सांगताय खरं.!
पण कार्यकर्ता असलेलं बरं..!!
बारामती:-लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून देशात राजकीय वातावरण तापले असताना त्यामध्ये बारामती लोकसभा कशी मागे राहील.. हो कारण याठिकाणी खऱ्या अर्थाने निवडणुकीची रंगत आली असून चुलता पुतण्या मध्ये राजकीय वातावरण तापले आहे,शरद पवार साहेबाच्या विरोधात खुद्द अजितदादा पवार उभे असून सुप्रिया ताई सुळे विरुद्ध सुनेद्रा वहिनी पवार लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरल्या असून ही निवडणूक अटीतटीची होईल अशी चर्चा चालू असून यामध्ये प्रामुख्याने चमकोगिरी करणारे व मी किती नेत्याच्या जवळ आहे अश्या तोऱ्यात नेत्याच्या मागे उभे राहून पक्ष शिस्तीची वाट लावायची हे समस्त मतदार उघड्या डोळ्यांनी पहात होती व आहे, मात्र यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र कुठेतरी उन्हात किंवा बाजूला किंवा गर्दीत असतो तो खऱ्या अर्थाने आपल्या नेत्यावर असणाऱ्या निष्ठे पोटी आलेला असतो म्हणून त्याचे कर्तव्य समजतो व पक्षासाठी जोमाने काम करीत असतो,म्हणून कार्यकर्ता सच्चा असतो,पक्ष नेतेमंडळी कार्यकर्त्या पेक्षा नेता पुढाऱ्याला कसा वेळ देतील यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने हट्ट करून तर कुठे कोंडीत पकडून नेत्यांना वेठीस धरत आहे आपणांस व इतरांना देखील दिसत आहे, त्यामुळे अश्या पद्धतीने जर घडत असेल तर ऐन मतदान वेळी कार्यकर्ता आपला खेळ मतपेटीतून दाखविल्या शिवाय राहणार नाही कारण तो निष्ठेने आपलं काम करतो पण त्याचा फायदा मधली पुढारी मंडळी जी आपल्या कानापर्यंत पोहचत आहेत ते आपला स्वार्थ साधण्यासाठी करीत आहे हे आपण स्वतःच्या मनाला आत्मचिंतन करून विचारा कारण मागील काही निवडणुकीत हे चमकोगिरी करणारे पुढारी आपल्या विरोधात दिवसा प्रचार करायचे आणि रात्रीच्या वेळेस आपल्या दरबारी व कोणालाही कळणार नाही अश्या ठिकाणी भेटून आपली पोळी कशी भाजून घेत होते हे आपल्याला ज्ञात आहेच म्हणून आपण यांच्या पासून सावध रहा कारण आत्ता यांच्या मागे प्रामाणिक कार्यकर्ता सुद्धा उरला नाही,कारण कार्यकर्त्यांनी यांची राजकिय खेळी कशी स्वार्थासाठी चालू आहे हे ओळखले असून दादा आपण सांगताय खरं सर्वांनी प्रामाणिक काम करायचं पण ते काम पुढारी म्हणून नाही तर प्रामाणिक कार्यकर्ते बनून करणं कधीही चांगलं हे यानिमित्ताने सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहे. पुढील भागात आणखी वेगळं..
No comments:
Post a Comment