धक्कादायक..बारामती शहरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक इंजेक्शनची चालू होती विक्री;दोघांना अटक.
पेट्रोलिंग चालू असताना पिंपळी गांवचे हद्यीमध्ये कॅनॉललगत अंधारामध्ये दोन इसम आपले हुंदाई कंपनीचे वेरना कारमध्ये बसले असताना मिळून आल्याने त्यांचेकडे त्यांचे नांव, पत्ता विचारता त्यांनी आपली नांवे (१) अभय सम्राट जाधव वय २२ वर्षे रा. श्रीरामनगर कसबा बारामती ता. बारामती जि.पुणे (२) श्रीकांत अर्जुन घुले वय २३ वर्षे रा. खताळपट्टा ता. बारामती जि.पुणे अशी असल्याचे सांगितले. त्यांचेकडे त्याठिकाणी येण्याचे कारण विचारता ते दोघेही उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने त्यांचा संशय आल्याने त्यांची अंगझडती तसेच त्यांचे कारची झडती घेतली असता त्यामध्ये मिफेनटरमीन (
MEPHENTERMINE) हे मानवी शरीरास घातक असलेले ६० इंजेक्शन मिळून आले.
इसम नामे (१) अभय सम्राट जाधव वय २२ वर्षे रा. श्रीरामनगर कसबा बारामती ता.
बारामती जि.पुणे (२) श्रीकांत अर्जुन घुले वय २३ वर्षे रा. खताळपट्टा ता. बारामती जि. पुणे याचेवर
बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके हे करीत आहेत.
सदरबाबत अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक सचिन शिवदास बुगड
यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भेट देवून सदर इंजेक्शनचा उपयोग हृदयविकाराचे आजारामध्ये केला जातो. परंतू सध्या सदर इंजेक्शनचा उपयोग तरुण मुले ही व्यायाम करुन बॉडी बिल्डींगसाठी व व्यसन म्हणून करत असल्याची सांगितले आहे. तसेच सदर इंजेक्शनमुळे कायमस्वरुपी तंद्री लागणे, ब्लड
प्रेशर जास्त राहणे, किडनी निकामी होणे असे दुष्परिणाम होत आहे.अशा प्रकारे बेकायदेशिरपणे इंजेक्शन बाळगणाऱ्या इंसमांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ
पोलीस स्टेशनला कळविणेबाबत पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी आवाहन केले आहे.
तसेच, अशा प्रकारच्या शरीरास घातक असणारे इंजेक्शन घेवून स्वतः चे आरोग्याची तसेच
शरीराचे अवयव कायमस्वरुपी निकामी करुन घेण्याऐवजी पारंपरिक व्यायाम करुन शरीरयष्टी कमविण्याकडे तरुणांनी भर द्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख. पुणे ग्रामीण, मा. अपर
पोलीस अधिक्षक बारामती श्री. संजय जाधव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती श्री. सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक श्री. संतोष घोळवे . यांचे मार्गदर्शनखाली सदर कारवाईमध्ये बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, अभिजित कांबळे, अक्षय सिताप, दशरथ इंगोले, सागर जामदार, दादासाहेब जाधव, विशाल शिंदे, गौरव ठोंबरे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment