बापरे.. मुलीकडून आईचा खून;तिने मित्राला घरी बोलावून 'तो' प्रकार समजला तर म्हणून काढला काटा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 8, 2024

बापरे.. मुलीकडून आईचा खून;तिने मित्राला घरी बोलावून 'तो' प्रकार समजला तर म्हणून काढला काटा..

बापरे.. मुलीकडून आईचा खून;तिने मित्राला घरी बोलावून 'तो' प्रकार समजला तर म्हणून काढला काटा..

पुणे :- चक्क मुलीनेच मित्राच्या मदतीने आईचा खून केल्याची घटना घडली याबाबत मिळालेली माहितीनुसार पैशांसाठी आईचा डोक्यात हातोड्याने घाव घालून खून करण्यात आल्याची घटना वडगाव शेरीमध्ये समोर आली आहे. मित्राच्या मदतीने खून केल्यानंतर आई घरातील मोरीत घसरून पडल्याचा बनाव रचण्यात आला. परंतु, नातेवाईकांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली आणि खुनाचा हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगल संजय गोखले (वय ४५, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर,
वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (वय १८, रा.राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योशिता ही मंगल गोखले यांची मुलगी आहे. तिने मित्राच्या मदतीने मंगल यांच्या बँक खात्यामधून परस्पर पैसे काढले होते. आईला हा प्रकार समजला तर ती रागावेल अशी भीती तिला वाटत होती.
तिने आईचा थेट खून करण्याचाच कट आखला. तिने मित्राला घरी बोलावून घेतले. त्याला घरातील हातोडा दिला.मंगल या घरात झोपलेल्या असतानाच आरोपी यश याने  त्यांच्या डोक्यात हातोड्याने घाव घालायला सुरुवात केली.
त्यावेळी योशिताने आईचे तोंड स्कार्फने दाबलेले होते.त्यानंतर, आई पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचा बनाव रचण्यात आला. दरम्यान, या मृत्यूबाबत नातेवाईकांना शंका आली. त्यांनी पोलिसांकडे याबाबत शंका उपस्थित केली.परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा
पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास करून हा खुनच असल्याचे समोर आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.

No comments:

Post a Comment