पुढारी तुपाशी.!कार्यकर्ते उपाशी..!!
बारामतीत कोण घेणार खोका..पोपटराव तुपे व गोपीनाथ पडळकर नंतर कुणाला मिळणार धोका..?
बारामती(संतोष जाधव):-देशात व राज्यात बारामती लोकसभा निवडणूक चांगलीच रंगत धरत आहे, हो कारण ही तसेच आहे यंदाची निवडणूक ही चुलता - पुतण्याची अस्तित्वाची असून लेकी विरुद्ध सून अशी असून ती प्रतिष्ठेची होत आहे,आणि याचाच फायदा राजकीय चमकोगिरी करणारे पुढारी आपली पोळी भाजून करीत आहे, स्वाभिमानी कार्यकर्ता मात्र फरफटत आहे,नक्की कोणाचं काम करायचे जे केलं त्याच काय..अश्या संभ्रमात असून त्यांची द्विधा मनस्थिती झाली असून यांना विश्वासात न घेता त्यांचा वापर मात्र चमकोगिरी करणारे पुढारी आपल्या स्वार्थासाठी घेत असल्याचे दिसत आहे,ठराविक जणांना वरिष्ठांनी जवळ करायचे आणि त्यांना कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी लागणारी सनद मात्र ती कार्यकर्त्यांपर्यंत न पोहचता ती पुढार्यांच्या खशात जाते, याची अनेक उदाहरणे पुराव्यानिशी मिळतील म्हणून नियोजन,आयोजन करणाऱ्या राजकिय पक्षाच्या श्रेष्टींनी याची दखल घेणे गरजेचं आहे अन्यथा मागील निवडणूकीत पोपटराव तुपे व गोपीनाथ पडळकर यांच्या निवडणूक दरम्यान कसं जवळच्या चमकोगिरी व मलिदा खाणाऱ्या पुढाऱ्यांनी फसविले हे सर्वज्ञात आहे, असे असताना पुन्हा अश्या पुढाऱ्यांना येणाऱ्या लोकसभा मतदार संघातील बारामती या ठिकाणी पुन्हा धोकाधडी होऊ नये याची काळजी घेणे व वेळीच सावध होणं गरजेचं आहे, कारण हे कोण लोक आहेत हे नेत्यांना माहीत आहे, कारण मागील निवडणूक दरम्यान निम्या रात्रीला हे कुठे कुठे आपल्याला भेटायला व मलिदा घेण्यासाठी आले होते हे सांगणे म्हणजे माशाला पोहायला शिकवणे असं होईल त्या साठी आत्ता वेळ गेलेली नाही कारण सर्वसामान्य कार्यकर्ता हा उपाशी राहून फक्त आपल्या स्वाभिमानासाठी काम करीत आहे मात्र पुढारी हा तुपाशी आहे तेव्हा येणाऱ्या मतदानातून वेगळा चमत्कार घडला तर नवल वाटून घेऊ नये कारण मागील निवडणूकीत कसं फसवा फसवी केली हे पुनःश्च आपण आठवा व यांच्यापासून सावध व्हा अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे..*पुढील अंकी आणखी वेगळं*
No comments:
Post a Comment