बारामतीत मलिदा खाणाऱ्याची नाही कमी.!
कारण काही विरोधक आहेत डमी..!
बारामती:-राजकीय विश्लेषण नुसार लोकसभा निकाल हा धक्कादायक लागेल असं सांगितलं जातंय परंतु प्रामाणिक मेहनत व निष्ठेने केलेल्या कामामुळे कदाचित निकाल वेगळा होऊ शकतो पण त्यासाठी असणारी निष्ठा व प्रामाणिकपणा हा तेवढाच महत्वाचा असतो हे होणं गरजेचं आहे, पण तसं सद्या तरी दिसून येत नसल्याचे बारामती लोकसभा संघात ऐकावयास येत असून उलट सुलट चर्चेने मतदार संभ्रमात असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले, सांगायचे झालं तर सद्या बारामतीत लोकसभा निवडणुक चुरशीची होत असून पुढारी सद्या हवेत असले तरी कार्यकर्ता मात्र *आमचं आत्ता ठरलंय* या भूमिकेत असल्याचे दिसत असल्याचे कळतंय. कोण जाणं चमकोगिरी पुढाऱ्याला धडा शिकविण्यासाठी तर कार्यकर्ते कामाला लागले नसतील आतून एक वरून एक अशी परिस्थिती सद्या दिसत असून चार जून रोजी याचा प्रत्यय येईल तोपर्यंत तरी नेत्यांनी वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचे आहे, नाही तर स्वतःच्या पायावर धोंडा मारल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे,कारण खऱ्या अर्थाने काही विरोधक हे डमी आहे हे आपल्याला चांगलंच माहीत असूनही त्यांच्या हातात कारभार देणं किती धोकादायक आहे येणाऱ्या काळात त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल अशी प्रामाणिक कार्यकर्ता आपलं मत हे मनापासून मांडत असल्याचे दिसत आहे, मात्र नेत्यांचे कान हलके आहेत ते कदाचित डमी विरोधाकाचे ऐकतील पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे ऐकणार नाहीत हे सद्या चित्र दिसल्याशिवाय राहणार नाही.*पुढील अंकी आणखी वेगळं*
No comments:
Post a Comment