रस्त्यात साचलेले पाणी महिलांच्या अंगावर उडाल्याने फ्री स्टाईल हाणामारी;ह्याला सोडायचा नाही,खल्लास करायची धमकी.!
पुणे:-रस्त्यावरील साचलेले पाणी दोन महिलांच्या अंगावर उडविले त्यानंतर काय घडले याबाबत मिळालेले माहितीनुसार पुण्यातील उरुळी कांचन
जवळीत टिळेकरवाडीत फ्री स्टाईल हाणामारीची घटना समोर आली आहे.दुचाकीवरून जात असताना रेसकरून रस्त्यावरील साचलेले पाणी दोन महिलांच्या अंगावर उडविले असता
याचा जाब महिलांनी विचारताच दुचाकीस्वार आरोपीने महिलांच्या घरी जावून शिवीगाळ व दमदाटी केली.याचे रुपांतर भांडणात होऊन तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार टिळेकरवाडी (उरुळी कांचन, ता. हवेली) येथील राऊत वस्ती परिसरात गुरुवार रोजी घडला. याप्रकरणी १२
जणांच्या विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक विठोबा राऊत, नितीन अशोक राऊत, सुशिल
अशोक राऊत, सौरभ भरत राऊत, तुकाराम गायकवाड,कुंडलिक गायकवाड, प्रणव गायकवाड, पुष्पा अशोक राऊत, कविता नितीन राऊत, रुपाली सुशिल राऊत, कुमार शंकर राऊत, वैशाली गायकवाड (सर्व रा. सापळेकर वाडी,
राउत वस्ती ता हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संदिप मच्छींद्र राऊत (वय 50 धंदा शेती रा. टिळेकर वाडी राउत वस्ती उरुळीकांचन ता. हवेली जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप राऊत यांच्या पत्नी व बहिणीच्या अंगावर हे रस्त्यावरील पाणी उलविण्यात आले. फिर्यादी यांची दोन्ही मुले सहजपुर गावची यात्रा असल्याने यात्रेनिमीत्त दोन्ही मुले व बहीण
वंदना सतिश झगडे असे घरी आले होते. दरम्यान, फिर्यादी यांची सिमा व बहीण वंदना या गुरुवारी कपडे धुण्यासाठी रानात गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर घरी येत असताना,फिर्यादी यांचा चुलत चुलता अशोक विठोबा राउत हे पाठीमागुन टुव्हीलवर वरून आले आणि दुचाकीची रेसकरून रस्त्यावर साचलेले घाण पाणी त्या दोघींच्या अंगावर उडविले.झालेल्या प्रकाराची फिर्यादी यांनी आरोपींकडे विचारणा केली असता आरोपींनी घरी येऊन शिवीगाळ व दमदाटी
केली. तसेच आज ह्याला सोडायचा नाही, याला खल्लास करायचं, असे म्हणून हातातील लाकडी दांडके, गज,कु-हाड, दगड, विट घेवुन बेकायदा गर्दी जमवुन फिर्यादी संदिप राऊत त्यांची पत्नी सीमा, मुले संकेत, सुयश व बहिण वंदना यांच्या हातपायावर, तोंडावर, पाठीत,डोक्यात, नाकावर, मांडीवर, खांद्यावर मारहाण करुन दुखापत केली. या मारहाणीत ५ जन जखमी झाले आहेत.पुढील तपास पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment