३६०० जणांवर बारामती विभागात प्रतिबंधात्मक कारवाई ;अपर पोलिस अधीक्षक जाधव यांची माहिती
बारामती:- बारामतीत नुकताच पोलीस व पत्रकार यांचा सवांद बैठक आयोजित करण्यात आली होती, यातून पत्रकार व पोलीस अधिकारी यांची एकमेकांना ओळखी यानिमित्ताने करण्यात आल्या, तर लोकसभा निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर ३६०० प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात जणांवर आल्याची माहिती बारामतीत पत्रकारांशी बोलताना अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. बारामतीच्या अपर
पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर या तालुक्यांतील ३६०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात बारामती विभागात
पोलिसांकडून १५३ दारूबंदीच्या केसेस करण्यात आल्या आहेत. १९ ठिकाणी जुगारावर कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या अनुषंगाने
तीन कारवाया स्थानबद्धतेच्या करण्यात आल्या आहेत.निवडणूक कालावधीत कोणताही
अनुचित प्रकार घडू नये यासाठी ७७३
जणांची शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. चेकपोस्ट तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, याची
सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
बारामती शहर व तालुक्यात वाहतूक विभागासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
बारामती शहरात वाहतूक कोंडीसह
पार्किंग व अन्य प्रश्न आहेत; परंतु
सध्या वाहतूक पोलिस प्रत्येक चौकात
असतील, शहरभर त्यांची गस्त सुरू
असेल अशी व्यवस्था करण्यात आली
आहे. याशिवाय निर्भया पथकाचे
कामकाज यादव यांच्याकडे देण्यात आले
आहे. प्रत्येक शाळा-महाविद्यालयाचा व्हॉट्सअॅप ग्रुप छेडछाड व अन्य घटनांना त्यामुळे तयार केला आहे.आळा बसू शकेल. चोरी किंवा अन्य अनुचित प्रकार घडल्यास
सीसीटीव्हीची मोठी मदत पोलिस
खात्याला होते. त्यामुळे व्यावसायिकांनी या कामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अपर पोलिस
अधीक्षक जाधव यांनी केले.
No comments:
Post a Comment