परभणीचे खासदार संजय जाधव यांचे बारामतीच्या कोकरे यांना भेटीचे निमंत्रण..
बारामती:-बारामतीतील ब्रम्हदेव कोकरे यांच्या सह त्यांच्या निकटवर्तीय यांना परभणीचे उमेदवार खासदार संजय(बंडू)जाधव यांनी भेटीचे निमंत्रण दिल्याचे समजले, ब्रम्हदेव कोकरे हे महादेव जानकर यांचे पूर्वीचे सच्चे कार्यकर्ते होते त्यांनी राष्ट्रीय समाज पार्टी चे काम तन मन धनाने कोकरे यांनी केले त्यांना मिळालेल्या निमंत्रण हे चर्चेचा विषय होत असून परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव हे निवडणूक रिंगणात उतरले असून बारामतीतील पणदरे या गावातील कोकरे यांनी आपल्या सहकार्यासोबत लवकरच भेटीला जात असल्याने तर्क वितर्क काढले जात असून धनगर समाजातील कोकरे हे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले असून एकेकाळचे महादेव जानकर यांचे q कट्टर कार्यकर्ता असणारा आज परभणीच्या मतदार संघात जाऊन नक्की काय भूमिका बजावतात हे पाहणे औचित्य ठरेल.
No comments:
Post a Comment