बारामतीत चालुय राजकीय पक्षात विशिष्ट जातीचं राजकारण..
बारामती:-लोकसभा निवडणुकीत चांगलीच रंगत आली असून चमकोगिरी पुढाऱ्यांपासून ते लाळघोट्या कार्यकर्त्यांपर्यत वावरणाऱ्या व पुढे पुढे करून आपली पोळी कशी भाजून मिळेल यासाठी सतत वरीष्ठ मंडळी आली की पुढे पुढे करून मी किती सक्रिय आहे हे दाखविण्याचा निर्लज्ज पणा कसा करीत असतो हे दिसून येतो,खुर्चीसाठी किती लाचारपणा करितो हे समोर बसणाऱ्या व स्वाभिमानी कार्यकर्त्याला विचारा तो आपल्या शब्द शैलीत याचं काय प्रतिक्रिया देतो हे कळेल ,ही वस्तू स्थिती असून अलीकडे आपण किती पुढे येऊन चमकतो व आपली कामे आपल्या नातेवाईकांची कामे कशी करून घेऊ व आर्थिक दलाल गिरी कशी करून घेता येईल हे पाहत असतो अशी अनेक स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून अनेक अनुभव सुद्धा सांगितले.ही काय जिल्हा परिषद किंवा कारखाना किंवा पंचायत समिती, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत निवडणूक नाही ही निवडणूक लोकसभेची आहे आणि याठिकाणी विशिष्ट जातीचं राजकारण करून त्यांचेच लोक मलिदा खाण्यासाठी जवळ करणं किती महागात पडू शकत हे येणाऱ्या मतदान पेटीतून दिसून येईल अशीही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.त्यामुळं बारामती लोकसभा ही सहजासहजी जिकणे हे जेवढे सोपे वाटते तेवढेच अवघड होणार जर आपण फक्त विशिष्ट जातीचं राजकारण करीत असाल तर येणाऱ्या काळात आपल्याला चित्र वेगळं झालेलं दिसेल आवर्जून सांगणं गरजेचं असल्याचे मत मांडण्यात आले. चमकोगिरी व लाळघोट्या पासून वेळीच सावध व्हा व सर्व सामान्य कार्यकर्त्यांना देखील तेवढेच महत्त्व द्या कारण एक मत देखील आपला चमत्कार दाखवू शकतो याची अनेक उदाहरणे आहेत... पुढील अंकी आणखी वेगळं.
No comments:
Post a Comment