बारामती येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषद उपसभापती यांचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निर्देश..
पुणे दि. २:- बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर खाऊचे आमिष दाखवत सोळा वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी २९ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या परिसरात मोठ्याप्रमाणत बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी परराज्यातील मजूर कामासाठी आले होते. याच मजुरांच्या कुटुंबातील एका साडेतीन वर्षीय बालिकेवर हा प्रसंग ओढवला. त्या परिसरात असणाऱ्या एका किराणा मालाच्या दुकानातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने तिला खाऊचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या पालकांना ही घटना
माहीत झाली. दि. ३० मार्च २०२४ रोजी पीडित मुलीच्या पालकांनी माळेगाव पोलिस स्टेशनला
गुन्हा दाखल केला. नोंदविलेल्या तक्रारीनुसार नुसार माळेगाव पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली. लहान मुलींची अश्या प्रकारे होणारी फसवणूक ही गंभीर आहे असे मत मा. उपसभापती विधानपरिषद यांनी व्यक्त केले.
त्यामुळे सदर घटनेची चौकशी करण्यात यावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन पीडितांना
न्याय मिळेल असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये याची दक्षता घेण्यात यावी. अश्या अपप्रवृत्ती व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात अश्या गुन्हयाची पुनरावृत्ती होणार नाही व अशा घटनांना निश्चितच आळा बसेल असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.सदर महिला व बालकल्याण विभागाकडून ठोस उपाय योजनांची कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे. पीडितेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पीडितेला सरकारी वकील देण्यात यावा. असे निर्देश ही डॉ नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिले आहेत व पालकांनी सुद्धा अनोळखी व्यक्ती
बरोबर आपल्या मुलांना मैत्री करू देऊ नये. सजग राहून सावधानता बाळगावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी बोलताना केले.
No comments:
Post a Comment