खळबळजनक..1 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी PSI सह एकाला अँटी करप्शनकडून
अटक..
परभणी:- लाच लुचपत विभागाचे कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाळूचा पकडलेला
ट्रक सोडवण्याकरीता न्यायालयात रिपोर्ट
सादर करण्यासाठी लाच मागणाऱ्या आणि
ती स्वीकारणाऱ्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आणि खासगी व्यक्तीला परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. रिपोर्ट सादर करण्यासाठी पीएसआय ने खासगी व्यक्तीच्या माध्यमातून एक लाख रुपये
लाच मागितली होती. त्यापैकी 50 हजार
रुपये स्वीकारताना दोघांना अटक केली.
श्रेणी पोलीस उप निरीक्षक गजानन रामभाऊ जंत्रे(वय 54 रा.राजर्षी शाहू महाराज नगर, मानवत, ता.मानवत, जि. परभणी),खाजगी इसम मुंतसिर खान कबीर खान पठाण उर्फ बब्बुभाई (वय 58 रा. खडकपुरा कुरेशी गल्ली, मानवत,
ता.मानवत, जि.परभणी) असे एसीबीने
अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.याबाबत 27 वर्षीय व्यक्तीने परभणी एसीबीकडे तक्रार दिली आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रे हे
मानवत पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
आरोपी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जंत्रे
यांनी तक्रारदार यांचे रेतीचे ट्रक व ट्रक चालकास रेतीची वाहतूक करताना पकडले होते. त्यावरून मानवत पोलीस ठाण्यात कलम 379, 34
नुसार गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्यातील जप्त केलेला ट्रक सोडविण्याकरिता
न्यायालयात रिपोर्ट सादर करण्याकरिता जंत्रे यांनी तक्रारदार यांना एक लाख रुपये लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी 19 मे रोजी एसीबी परभणी येथे तक्रार केली,एसबीच्या पथकाने मंगळवारी (दि.21)मानवत येथे पंचासमक्ष करण्यात
आलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान,
आरोपी पीएसआय जंत्रे यांनी मानवत
पोलीस ठाण्यातील त्यांच्या कक्षात तक्रारदार यांना त्यांचे पोलीस कस्टडी रिमांडचे वेळी केलेल्या मदतीसाठीचे राहिलेले 10 हजार रुपये लाचेची मागणी केली.त्यावरून तक्रारदार यांनी 10 हजार रूपये माफ करा असे म्हणाले. त्यानंतर न्यायालयात रिपोर्ट दाखल करण्यासाठी
तडजोडी अंती 70 हजार रुपये लाचेची
मागणी जंत्रे यांनी केली. त्यापैकी पहिला हप्ता 50 रुपये तेथे हजर असलेला आरोपी खाजगी
इसम मुंतसिर पठाण उर्फ बब्बुभाई याच्याकडे देण्यास सांगितले. उर्वरित 20 हजार रुपये न्यायालयात रिपोर्ट सादर केल्यानंतर द्या असे म्हणून लाच मागणी केली. त्यानंतर पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी खाजगी इसम पठाण याने मोटारसायकल वर बसून तक्रारदार यांचे कडून लाचेची
रक्कम 50 हजार रुपये स्विकारून लाचेच्या रक्कमेसह पळून गेला.आरोपी पठाण यांचा मानवत शहरात शोध घेऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले.आरोपी श्रेणी पोलीस उप निरी जंत्रे याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
जंत्रे याच्या मानवत येथील घराची घरझडती घेतली असता रोख रक्कम 74 हजार 500रूपये मिळून आले.दोघांवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांनी सापळा रचत कारवाई केली. पोलीस
पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment