धक्कादायक.. बापरे एकदा नव्हे तर 70 वेळा दीड वर्षे अत्याचार; क्लासमधील शिक्षकाच लज्जास्पद कृत्य..
सीतामढी :-एका क्लास मधील धक्कादायक घटना उघडकीस आली, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एका नराधमानं आपल्या विद्यार्थिनीसोबत अत्यंत
लज्जास्पद कृत्य केलं, ज्याबाबत कळताच संपूर्ण
परिसरातले लोक हादरले. त्यानं विद्यार्थीनीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत
शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान तिचे नग्न व्हिडीओ काढले आणि त्यावरून तिला ब्लॅकमेल केलं. असंच छळून त्यानं तब्बल दीड वर्ष तिच्यावर अत्याचार केले. जेव्हा जेव्हा ती त्याला लग्नाबाबत विचारायची, तेव्हा तेव्हा तो
तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा.प्रकरण उघडकीस आलं कसं?
एके दिवशी पीडितेच्या आईनं तिला शिक्षकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. ते खतरनाक दृश्य पाहून आईचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तिनं काही दिवस याबाबत कोणालाच काही सांगितलं नाही. आधी
स्वतः व्यवस्थित शहानिशा करून मग पोलिसात
शिक्षकाविरूद्ध एफआयआर दाखल केली.
हे प्रकरण आहे बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातल्या एका गावचं. इथं आरोपीनं क्लास सुरू केला होता. 2022 पासून पीडिता या क्लासला जायची. 30 एप्रिल 2024 या दिवशी
तिला घरी यायला खूप उशीर झाला म्हणून तिची आई तिला शोधायला क्लासमध्ये गेली. तेव्हा तिनं समोर जे पाहिलं, ते भयानक होतं. लेकीला नको त्या अवस्थेत बघून आईनं नराधमाला चांगलंच सुनावलं आणि लेकीचा कान पिळून तिला घरी नेलं.चौकशीत अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. 10 सप्टेंबर 2022 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत नराधमानं पीडितेवर तब्बल 70 वेळा बलात्कार केला.दरम्यान, पीडितेच्या आईनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा याबाबत कळलं तेव्हा ती नराधमाच्या घरी जाब विचारण्यास गेली, तेव्हा त्यानं आणि त्याच्या
आई-वडिलांनी तिला 2 लाख रुपये घेऊन शांत बसण्यास सांगितलं. जेव्हा तिनं पोलिसांत जाईन असं सांगितलं तेव्हा त्यांनी तिला मारहाण केली. आता यावर पोलीस तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment