बारामती तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सहा घरे फोडत रोख रक्कमेसह लाखोंचा ऐवज केला लंपास..
वडगाव निंबाळकर:-बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर व मुढाळे येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत सहा घरे फोडत रोख राकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला. गेल्या दोन दिवसांपासून कोऱ्हाळे व वडगाव निंबाळकर परिसरात मध्यरात्री ड्रोन घिरट्या घालत असल्याचे ग्रामस्थांना दिसले आहे. त्यामुळे ड्रोन च्या साहाय्याने टेहळणी करत ही चोरी केली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
काल रात्री १ ते ४ च्या दरम्यान ही घटना घडली. वडगाव निंबाळकर मधील जाधव आळी येथे दोन घरे, बनकर वस्ती वरील एक दुचाकी, जाधव वस्ती मुढाळे रोड पत्रकार सुनील जाधव यांचे घर फोडून आठ तोळे सोने व रोख दीड लाख तसेच मुढाळे येथे दोन घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. कालच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे आयपीएस अधिकारी दर्शन दुगड यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.
कोऱ्हाळे परिसरात मागील एक दिवसापूर्वी ड्रोन फिरत असल्याने नागरिकांच्या भीती निर्माण झाली होती यावेळी पोलिसांनी नागरिकांना भिऊन न जाता सतर्क राहण्याचे आव्हान केले होते. मात्र पोलिसांनी आव्हान करून एकच दिवस झाले तोच चोरट्यानीं पोलिसांनाच घरफोडी करून आव्हान दिले आहे. पोलिसांची गाडी सायंकाळी सात वाजल्यापासून जरी सायरन लावून फिरत असली तरी त्याचा चोरट्यांवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.
No comments:
Post a Comment