बारामतीत मटका धंदयानी काढले तोंड वर..
बारामती:-बारामतीत मटका धंदा बंद आहे असे म्हणून दिशाभूल होत असली तरी हे धंदे मात्र राजरोसपणे चालू असून कुणी उघड तर कुणी लपून तर कुणी मोबाईल वर हा मटका घेत असल्याचे मटका खेळणारे सांगत आहे. मात्र यावर फक्त सांगण्यापूरते कारवाई होताना दिसत आहे, नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे कारण सांगून तीन महिने अवैध धंदे बंद असल्याचा कागदोपत्री दाखविले असले तरी प्रत्यक्षात मात्र धंदे चोरून चालूच होते, आत्ता तर निवडणूक वातावरण संपले असल्याने खुले आम अवैध धंदे चालू असल्याचे कळतंय त्यातच मटका व दारू विक्री जोरात चालू असून पोलीस अधीक्षक याकडे दुर्लक्ष करीत तर नाही ना असा सवाल उठत आहे.
No comments:
Post a Comment