पत्रकार संघाची मागणी लोकसभेत लावून धरू -निलेश लंके ..
सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या शिष्टमंडळाला ग्वाही.
अहमदनगर (प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील पत्रकारांची प्रश्न आपणाला माहित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने निवेदनात केलेली मागणी आपण संसदेच्या सभागृहात लावून घेऊ अशी ग्वाही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी दिली तर लोकसभा निवडणुकीवर निकालानंतर इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असून आपलाही विजय पक्का आहे असा दावाही त्यांनी केला.
महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांचे नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची भेट घेऊन केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना वार्षिक काय करात पाच हजार रुपये सूट द्यावी या मागणीचे निवेदन दिले. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विविध पक्षाच्या उमेदवारांना पत्रकारांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्याची मोहीम राबवण्यात आली याच मोहिमे अंतर्गत पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी पत्रकार संघाच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेची माहिती दिली. यावेळी निलेश लंके यांनी पत्रकारांचे प्रश्न आपणाला जवळून माहित आहेत, आपल्या देशात पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे लोकसभेत प्रकारांचे प्रश्नांना आपण प्रधान्य देऊ.प्रदेशाध्यक्ष वसंत राव मुंडे राज्य संघटक संजय भोकरे यांनी बेळगाव दिल्ली गुजरात महाराष्ट्र गोवा राज्यात पत्रकारांचे चांगले संघटन केले असून पत्रकारांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे योगदान आहे. वसंत मुंडे यांनी केलेली मागणी वृत्तपत्र सृष्टीला नवीन ऊर्जा देणारी आहे त्यामुळे केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर आपण या मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून अशी ग्वाही त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडी सरकार येणार आहे आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आपला विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला.यावेळी पत्रकार संघाचे डायरी, दिनदर्शिका व माहिती पुस्तिका देण्यात आली.यावेळी दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर यासह पत्रकार व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment