बारामतीत घड्याळ पडले.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 30, 2024

बारामतीत घड्याळ पडले..

बारामतीत घड्याळ पडले..
बारामती:-बारामतीत घड्याळ पडले हे वाचून धक्का नक्कीच बसला असेल.. पण हो जरा थांबा घड्याळ पडले म्हणजे निवडणूक चिन्ह घड्याळ पडले असे नव्हे, तर बारामतीच्या विकासात व सोंदर्यातभर  घालण्यासाठी तीन हत्ती चौक शेजारी नटराज नाट्य मंदिर लगत कॅनॉल जवळ असणाऱ्या गार्डन मध्ये ऐन मतदानाच्या अगोदर तातडीने बसविण्यात आलेले भव्य उंचीवर मनोऱ्यावर घड्याळ भलं मोठं बसविले होतं..कदाचित त्याचा मतदारांवर प्रभाव पडावा असा ही असू शकतो असं बोललं जातंय. परंतु काही दिवसांतच अजून बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल देखील झाला नसल्याने मनोऱ्यावर असणारे घड्याळ पडले(जे आत्ता अर्धे दिसत आहे यावरून कदाचित पडले असेल अशी प्रतिक्रिया उमटत असल्याची चर्चा आहे)आहे त्यावरून तरी सद्या बारामतीत चौका चौकात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

No comments:

Post a Comment