आत्महत्या की हत्या...?आहे काही तरी काळंबेरं..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 31, 2024

आत्महत्या की हत्या...?आहे काही तरी काळंबेरं..!

आत्महत्या की हत्या...?आहे काही तरी काळंबेरं..!
बारामती(संतोष जाधव):-आत्महत्या की हत्या..अशी शंका जेव्हा निर्माण होते तेव्हा काहीतरी काळंबेरं असावं हे नक्की,मात्र यामध्ये तपास यंत्रणा सक्षम लागते कोणत्याही राजकिय दबावाखाली काम करणारी नसावी तर खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल, कारण आत्महत्या दाखवून प्रकरण दाबणे आणि नंतर त्याचा पर्दापाश् झाल्यावर सत्य बाहेर येणं तोपर्यंत कायद्यावरचा विश्वास मात्र गमावून बसलेला असतो अशी अनेक प्रकरणे याठिकाणी मांडली आहेत की, त्याचा शेवट काय झाला,पण सहजासहजी आत्महत्या करून जीव कोणी गमावत नसतो, एक तर तो कर्ज व दुखणं याला वैतागलेला असतो. तेव्हा तो आत्महत्या चा मार्ग स्वीकारत असल्याचे अनेक घटनेवरून दिसले आहे. पण अलीकडे कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरतो त्यामध्ये आत्महत्या होऊ लागल्यात त्यामध्ये कुटुंबातील व्यक्ती जबाबदार धरून जेलची हवा खावी लागते हे फक्त गोरगरिबांना तर काही ठिकाणी हत्या असतानाही आत्महत्या दाखवून तो जिरवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण घेऊन होतो हे चित्र संतापजनक आहे,यामध्ये फेर तपास होणं गरजेचं असताना यासाठी कुणी पुढे येत नाही पण आम्ही मात्र अश्या घडत असलेल्या घटनेचा पूर्ण पर्दापाश् केल्याशिवाय राहणार नाही.मागील काही घटना घडल्या यामध्ये आत्महत्या दाखविल्या पण नंतर काय झालं याबाबत ची  उदाहरणे आहेत, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या जाण्यानं सर्वांनाच जबर धक्का बसला. परंतु, त्याचं असं अचानक जाण्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचं त्याच्या
काही प्रियजनांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरही,देखील सुशांतच्या मृत्यूमागे काहीतरी काळंबेरं असल्याची चर्चा जोरात आहे. यापूर्वीही काही बॉलिवूड कलाकारांचा मृत्यू गूढ निर्माण करून गेला होता.अद्याप पचवता आलेला
नाही. सुशांतच्या मेहुण्यानं या घटनेमध्ये काहीतरी
काळंबेरं असल्याचं म्हटलं आहे. सुशांतच्या मामाने सुशांतनं आत्महत्या केली नसल्याचं सांगितलं आहे.शवविच्छेदन अहवालात गुदमरल्यामुळे मृत्यू सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा धक्का बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांना अद्याप पचवता आलेला नाही. सुशांतच्या मेहुण्यानं या घटनेमध्ये काहीतरी
काळंबेरं असल्याचं म्हटलं आहे.यापूर्वीही काही अभिनेते-अभिनेत्रींचे मृत्यू संशयास्पदरित्या झाले होते. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी काही दिवस त्याची यापूर्वीची मॅनेजर दिशा सालियननंही आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजलेलं नाही.दिशा सालियननंही आत्महत्या केली होती. तिच्या
आत्महत्येमागचं कारण अद्याप समजलेलं नाही.
त्यामुळे अनेक प्रश्नांना तोंड फुटलं आहे.
श्रीदेवीचं काय?जवळपास दोन वर्षांपूर्वी, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी सर्वांना सुन्न करून गेली होती.तिच्या निधनाबद्दलही बरेच प्रश्न उपस्थित झाले होते.प्रथम त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं गेलं. नंतर त्या बाथटबमध्ये बुडाल्याची बातमी पुढे आली. त्याच्या मृत्यूबद्दल असंही बोललं
गेलं की, सौंदर्य टिकवण्यासाठी केलेल्या अनेक
शस्त्रक्रियांमुळे असं झालं असावं. दुबई पोलिसांनी दोनदा शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं असलं, तरी आजही बरेच लोक त्यांच्या मृत्यूला नैसर्गिक मानत नाहीत.दिव्या भारती खरंच पडली होती का? त्यांच्या मृत्यूला नैसर्गिक मानत नाहीत.
ज्याप्रमाणे दिशा सालियनच्या मृत्यूबाबत संशय
व्यक्त केला जातो, त्याचप्रमाणे अभिनेत्री दिव्या
भारतीच्या मृत्यूकडेही संशयानं पाहिलं गेलं होतं
दिव्या भारतीप्रमाणेच ६०-७० च्या दशकातील
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया राजवंशच्या निधनानंदेखील खळबळ उडाली होती. 'हिर रांझा' आणि 'हंसते जख्म'सारख्या हिट चित्रपटांची नायिका प्रिया राजवंशचं निधन तिच्या घरात रहस्यमय अवस्थेत झाल्याचं तेव्हा बोललं गेलं होतं. तिचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं आधी सांगण्यात आलं. नंतर मालमत्तेच्या वादातून तिची हत्या झाल्याचं तपासात
स्पष्ट झालं होतं. ७०-८०च्या दशकातील लोकप्रिय दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या निधनानंही अनेक प्रश्न उपस्थित केले होते काहींचं म्हणणं होतं की, मालमत्तेच्या वादातून तिची हत्या झाल्याच तपासात स्पष्ट झालं होतं. ७०-८०च्या दशकातील लोकप्रिय दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या निधनानंही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. काहींचं म्हणणं होतं की,घराच्या गच्चीवरुन उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. तर काहींच म्हणणं होतं की, ते पाठीच्या दुखण्यानं ते त्रस्त होते आणि त्यामुळे ते पडले. पण,अद्याप त्यांच्या मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट झालेलं नाही. अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या रहस्यमय
मृत्यूनंही पोलिसांसमोर पेच निर्माण केला.
त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील आणखी अनेक बड्या कलाकारांचा शेवट दुःखद आणि रहस्यमय झाला होता. अभिनेत्री परवीन बाबी, गायिका अभिनेत्री सुरैया, अभिनेत्री मीना कुमारी आदी गुणी कलाकारांचा शेवट ही यातलीच काही उदाहरणं आहे.अश्याच काही घटना प्रतिष्ठित व्यक्ती बाबत घडत असल्याने यामध्ये काही तरी काळंबेर असल्याचे चर्चेचा विषय झाला असून आत्महत्या नसून हत्याच असावी अशी शंका निर्माण होतात दिसत आहे याबाबत फेर चौकशी करण्याची मागणी होणार असल्याचे कळतंय.

No comments:

Post a Comment