पुर्वीचा काळ कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा होता-भास्कर मुंडे...माजी विभागीय आयुक्त यांची सदिच्छा भेट - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 30, 2024

पुर्वीचा काळ कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा होता-भास्कर मुंडे...माजी विभागीय आयुक्त यांची सदिच्छा भेट

पुर्वीचा काळ कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा होता-भास्कर मुंडे..
माजी विभागीय आयुक्त यांची सदिच्छा भेट

बीड (प्रतिनिधी):- मराठवाडा विभागाचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तर सनदी अधिकारी म्हणून ३२ वर्षापेक्षा अधिक काळ काम करताना आलेल्या अनेक अनुभव सांगताना प्रशासनात पुर्वीचा काळ कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा होता, आज त्याची वानवा दिसते असे स्पष्ट मत व्यक्त केले.

बीड येथे खाजगी कामानिमित्त आलेले सेवानिवृत्त मराठवाडा विभागाचे महसूल विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचे वसंत मुंडे यांनी स्वागत केले. यावेळी पत्रकार संघाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूकीत वर्तमानपत्रांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शंभर उमेदवारांना दिलेल्या निवेदनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तर ३२ वर्षापेक्षा अधिक काळ प्रशासकीय सेवेत काम करताना विविध माध्यमातील पत्रकारांनी मोलाचे सहकार्य केल्याची कृतज्ञ भावना व्यक्त केली. प्रशासकीय सेवेत लोकांना मदत करताना अनेक अनुभव येतात. अलीकडे मात्र प्रशासकीय यंत्रणेत आलेल्या लोकांबद्दल सर्वसामान्य माणसात नकारात्मकता दिसून येते. याला प्रशासकीय यंत्रणेतील लोकांचे वर्तन जबाबदार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुर्वीचा काळ कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा होता, आता त्याची वनवा दिसत आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment