ओव्हर टेक मुळे एसटी बसचा दिवेघाटात अपघात;सुदैवाने कोणालाही दुखापत नाही.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 12, 2024

ओव्हर टेक मुळे एसटी बसचा दिवेघाटात अपघात;सुदैवाने कोणालाही दुखापत नाही..

ओव्हर टेक मुळे एसटी बसचा दिवेघाटात अपघात;सुदैवाने कोणालाही दुखापत नाही..
हडपसर:- दिवेघाटामध्ये सासवडहून हडपसरच्या
दिशेने येणाऱ्या एसटीचा घाटात टँकरच्या ओव्हर टेक मुळे एसटी चालक गडबडला त्यामुळे अपघात झाला असल्याचे दिसत आहे,
डोंगराच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यालगतच्या चारीमध्ये एसटी गेल्याने अपघात झाला.
सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
दि.12 ला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डोंगराच्या बाजूला एका चारीत एसटी गेल्याने एसटी मधील प्रवाशांना दरवाजातून खाली उतरता येत नव्हते. अपघात झाल्यावर तेथून जाणाऱ्या  नागरिकांनी व पत्रकार संतोष जाधव तसेच एसटीतील प्रवाशांनी एकमेकांना मदत करत एसटी मधील प्रवाशांना खिडकीतून

बाहेर काढले. या एसटीमध्ये  प्रवासी प्रवास करत
होते. एकमेकांना मदत करत एसटी मधील प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले.घाबरलेल्या अवस्थेत असणाऱ्या प्रवासींना नागरिकांनी धीर दिला,दुपारी दोनच्या सुमारास सासवडहून हडपसरच्या दिशेने एसटी येत होती. यावेळी अचानक ओव्हरटेक करत समोरून येणाऱ्या टँकरमुळे चालकाचा तोल सुटला एसटी चारीत गेल्याचे प्रवाशांनी सांगितले. एसटीतील
प्रवाशी घाबरले होते. मात्र घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.याआधी दिवे घाटात ओव्हर टेक च्या नादात अनेक वेळा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment