प्रशासकीय भवनात निष्काळजी पणा; जिना चढताना होतेय हाल..लिप्ट बंद असल्याने चालू करण्याची मागणी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 26, 2024

प्रशासकीय भवनात निष्काळजी पणा; जिना चढताना होतेय हाल..लिप्ट बंद असल्याने चालू करण्याची मागणी...

प्रशासकीय भवनात निष्काळजी पणा; जिना चढताना होतेय हाल..लिप्ट बंद असल्याने चालू करण्याची मागणी...
बारामती:-विकसित बारामतीत कोट्यवधी रुपये खर्च करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासकीय भवन बारामतीकरांच्या सोयीसाठी बांधले परंतु हे काम होत असताना व भल्या पहाटे विकास कामावर अजितदादांची बारीक नजर असताना देखील प्रशासकीय भवन इमारतीचा काही स्टाईल निकृष्ठ दर्जाचे बसविले असल्याने काही ठिकाणी फुटल्याने चालणारे त्या मध्ये पडलेल्या खड्यात पडले होते तर टॉयलेट चे पाणी भिंतीतून पाजरून जिन्यातून बाहेर येत होते व दुर्गंधी सुटली होती तर पावसाळ्यात स्लॅब लीक होऊन

कार्यालयीन काम करीत असताना टेबलवर स्लॅब मधून पाणी पडत होते अश्या अनेक चुका या बांधकामात होत्या हे सर्व बारामतीकरानी पाहिले आहे, या भव्य अश्या इमारतीला लिप्ट असून प्रांतआधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात जाण्यासाठी तसेच रेकॉर्ड रूम कडे जाण्यासाठी जेष्ठ नागरिकांना कसरत करावी लागते कारण याठिकाणी लिप्ट असून ती मात्र शो ला आहे आणि नागरिक मात्र जिन्यातून ये जा करीत असतात आत्ता त्याची सवय झाली असली तरी नुकताच प्रशासकीय भवन इमारतीचे डागडुजीचे काम चालू आहे,जिन्याच्या लगत स्टाईल लावण्याचे काम चालू असून पाणी व सिमेंट चे पाणी सांडल्यामुळे जेष्ठ नागरिकांना जिना चढताना कसरत करावी लागते, जर चुकून एखाद्याचा पाय घसरला आणि पडले तर फार मोठी दुर्घटना होऊ शकते याची देखील काळजी घेतली गेली नसल्याने व तात्पुरती तरी लिप्ट चालू करायला हवी होती अशी मागणी होऊ लागल्याने प्रशासन कधी जागे होईल..उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्या बारामतीकराच्या अश्या छोट्या मोठ्या अडचणी असतात त्या कधी दूर होतील अश्या अपेक्षेत सद्या बारामतीकर वाट पाहत आहे.

No comments:

Post a Comment