बारामतीत तलाठी यांच्या नावाने लाच स्वीकारताना खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात..मोठे *मलिदा* खाणारे मात्र मोकाट..
बारामती:-बारामती खऱ्या विकसित होत असली तरी मात्र *मलिदा गॅंग* वाढत आहे याठिकाणी कोणतेही काम करायचं असेल तर पहिलं *मलिदा* चारावा लागत असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले विकसित बारामतीत भल्या मोठ्या शासकीय इमारती झाल्या असल्या तरी खाजगी एजंट देखील तेवढेच वाढले असून त्याचे अधिकारी यांच्याशी चांगलेच सूत जुळले असल्याचे दिसत आहे की काय बऱ्याच अधिकारी व कर्मचारी यांच्या कामात असे एजंट मध्यस्थी करताना वारंवार दिसत आहे, मात्र याकडे कोणाचे लक्ष नाही लाखो रुपये *मलिदा* खाणारे मोठे मासे मात्र सहीसलामत सुटतात आणि लहान मासा अडकतो ,जर खरोखरच प्रामाणिक चौकशी झाली तर मोठे मासे नक्की सापडतील अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे नुकताच बारामतीत सासऱ्यांच्या नावावर
असलेल्या जागेवर पत्नीच्या नावाची वारस
म्हणून नोंद करण्यासाठी तलाठी यांच्या
नावाने तीन हजार रुपये लाच
स्वीकारताना खासगी व्यक्तीला पुणे
एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई
शुक्रवारी (दि.17) बारामती तलाठी
कार्यालयाबाहेर प्रशासकीय
इमारतीच्या आवारात केली. चंद्रकांत परबत
जावळकर (वय-50 रा. कुंभारवस्ती,
कसबा ता. बारामती) असे लाच घेताना
पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत 34 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी
कडे गुरुवारी (दि. 16) तक्रार केली आहे.
तक्रारदार यांच्या सासऱ्यांच्या नावावर
बारामती शहरातील कसबा येथे जागा
आहे. या जागेवर तक्रारदार यांच्या पत्नीची
वारस म्हणून नोद करण्यासाठी तक्रारदार
यांनी बारामती तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. जागेवर वारस नोंद
करण्यासाठी खासगी व्यक्ती चंद्रकांत
जावळकर यांनी तलाठी यांच्यासाठी पाच
हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे
तक्रार केली. एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पडताळणी
केली असता, खासगी व्यक्ती चंद्रकांत
जावळकर याने तलाठी यांच्याकरीता
तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या पत्नीची
वारस नोंद करण्यासाठी पाच हजार रुपये
लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तसेच जावळकर याने तडजोडी अंती तीन
हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने तलाठी
कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या
आवारात सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपये
लाच स्वीकारताना चंद्रकांत जावळकर
याला रंगेहात पकडण्यात आले.
त्याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस
निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे
एसीबीच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment