बारामती ग्रामीण भागात अवैध दारू विक्री फोफावली;मोठे धंदेवाले सोडून छोट्यावर कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 25, 2024

बारामती ग्रामीण भागात अवैध दारू विक्री फोफावली;मोठे धंदेवाले सोडून छोट्यावर कारवाई..

बारामती ग्रामीण भागात अवैध दारू विक्री
 फोफावली;मोठे धंदेवाले सोडून छोट्यावर कारवाई..
पुणे(संतोष जाधव) :- पुणे जिल्ह्यात शहरी व
ग्रामीण भागात विशेषतः बारामती सारख्या विकसित क्षेत्रात अवैध दारू नीरा, जेजुरी,सुपे, व बारामती याठिकानावरून सर्रास येत असल्याचे सांगण्यात येत असल्याने याकडे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे की काय त्यामुळे राजरोस पणे अवैध दारू सर्रास विकली जात आहे झालीच कारवाई तर ती छोटे व्यावसायिक यांच्यावर होते मात्र मूळ  सप्लाय करणारा मालक यातून सुटला जातो नव्हे तो सोडला जात असल्याचे स्थानिक लोक सांगत आहे,कायदे कडक आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही कित्येक वर्षांपासून नीरा गावातून दारू सप्लाय होत असताना किती वेळा कारवाई झाली याचे उत्तर नाही मात्र याला पाठीशी घालणारे कोण हे तेवढेच महत्त्वाचे आहे, यासाठी लवकरच योग्य दिशा ठरवून कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना भाग पाडू असे देखील सामाजिक संघटनाकडून सांगण्यात येत आहे. बिअर शॉपी, वाइन शॉप यांसह परवानगी नसतानाही काही ढाबाचालक व हॉटेलचालक दारू पिण्याची परवानगी देताय तर ढाबा व हॉटेल
चालकांनो खबरदार. असा प्रकार आढळून
आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे
(एक्साइज)दारू पिणार्यांसह ढाबाचालकांवरही ५० हजारांपर्यंत दंड आणि ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.या खात्याने ८ महिन्यांत विविध
कारवायांमध्ये पुणे जिल्ह्यात ४९७ जणांवर
अटकेची कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हॉटेलिंग व मांसाहारी ढाब्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तळीरामांना ढाबा असो की हॉटेल या ठिकाणी मद्यपान केल्याशिवाय जेवण जात नाही. त्यात मांसाहार जेवण असेल तर मद्यपान करण्याचे ग्राहकांचे
प्रमाण या ठिकाणी मोठे असते. अधीक्षक चरणसिंग राजपूत आल्यापासून कारवाईचा धडाका सुरू केला असला तरी त्यांच्या कडे काही पुरावे देण्यात आहे. मग विनापरवानगी हॉटेल असो की, मांसाहारी ढाब्यामध्ये दारू पिण्यास बसलेल्या ग्राहकांना पाच हजारांपर्यंत
दंड ठोठावण्यात येतो. अशा मद्यपान करणार्या
व्यक्तीला किमान ५ हजार रुपये दंड
करण्याची तरतूद आहे. उत्पादन शुल्क
विभागाची धडक मोहीम सुरू असून
उत्पादन शुल्क खात्याचे सर्व अधिकारी
सध्या अॅक्शन मोडवर आले असले तरी सद्या तरी यामध्ये बिअर शॉपी, वाइन शॉपी यांसह
हॉटेल व ढाबामालकांकडून नियमांचे
उल्लंघन केले जात आहे.त्यांच्याकडून
ग्राहकांना दारू दिली जाते. त्यासाठी राज्य
उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई
करून अशा हॉटेल / ढाबा चालक व अन्य
३८३ ठिकाणांवर आत्तापर्यंत कारवाई
केली. तर ३१ लाख ६३ हजार रुपयांचा
मुद्देमाल जप्त करत ४९७ आरोपीवर
कारवाई केली असून ७ वाहने जप्त केली
आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून
नेहमीच धाब्यावर पाहणी एक्साइजच्या पथकाकडून  विविध होते. जिल्ह्यात ग्रामीण कारवाया होत आहेत,नियमांचे उल्लंघन करणार्या हॉटेल व ढाबाचालकांवर कारवाई सुरच राहणार
आहे.अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे यांनी प्रतिक्रिया दिली.

No comments:

Post a Comment