"पोलीस केस करशील तर मी जेलमध्ये गेल्यावर तुला रूपया देखील भेटणार नाही" अशी धमकी दिल्याने गुन्हा दाखल..
बारामती:-बारामती शहरातील येथे फिर्यादी- अनिल सहजानंद भारती वय-26 वर्षे, व्यवसाय मिल्कींग मशीन दुकान रा. भिगवन ता. इंदापुर जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून बारामती शहर पोलीस स्टेशन गु. रजि.न.402/2024 भाद वि का 420, 504,506 प्रमाणे आरोपी सचिन चंद्रकांत भोर रा .बारामती ता बारामती जि पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेली माहिती अशी की,
दि. 10/05/2024 रोजी 11/00 वा. श्रीरामनगर कमानी समोर बारामती येथे इसम नामे सचिन चंद्रकांत भोर रा. बारामती याने माझेकडुन मिल्कींग मशीनच्या दोन मशीनी खरेदी करुन विश्वासात घेवुन माझा विश्वास संपादन करून हेतुपुरस्सर स्वतःच्या फायदयाकरीता अप्रामाणिकपणे माझेकडुन 2 मशीनी घेवुन चेक वर खोटी सही करुन तो चेक मला देवुन माझी 70,000/- रुपयेची माझी फसवणुक केली आहे. मी त्यास फोन वर संपर्क साधुन मी दिलेल्या मशीनच्या पैशाची मागणी केली असता त्याने मला पोलीस केस करू नको, पोलीस केस करशील तर मी जेलमध्ये गेल्यावर तुला रूपया देखील भेटणार नाही अशी धमकी दिली. म्हणुन सचिन चंद्रकांत भोर रा बारामती. ता बारामती, जि पुणे याचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आल्याने अंमलदार मपोहवा पवार मॅडम यांनी दाखल करून घेतली असून तपास अंमलदार पोहवा शिंदे करीत आहे.याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास पोलीस स्टेशन शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
No comments:
Post a Comment